सोनम कपूरला 'या' गोष्टीचा काहीच फरक पडत नाही

Jan 18, 2018, 22:18 PM IST
1/5

Sonam Kapoor

Sonam Kapoor

जर सिनेमातील भूमिका चांगली असेल तर लहान पडद्याने काहीही फरक पडत नाही असं वक्तव्य अभिनेत्री सोनम कपूरने केलं आहे.

2/5

Sonam Kapoor

Sonam Kapoor

'नीरजा' सिनेमात केलेल्या उत्तम अभिनयासाठी सोनम कपूरला खूप चांगल्या सकारात्मक प्रतिक्रिया मिळाल्या. या भूमिकेसाठी सोनम कपूरला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा ताज मिळाला.

3/5

Sonam Kapoor

Sonam Kapoor

सिनेमा निवडण्यासाठी असलेल्या निकषांवर सोनम कपूने आयएएनएसला सांगितलं की, मला लहान-मोठ्या भूमिकेमुळे कुठलाच फरक पडत नाही. भूमिकेला प्रभावी बनविण्यासाठी प्रत्येक फ्रेममध्ये दिसणं गरजेचं नाहीये. जर माझी भूमिका प्रभावी आहे आणि मी केवळ तीनच दृश्यांत दिसली तरी ते स्टोरीत प्रभाव टाकू शकतात.

4/5

Sonam Kapoor

Sonam Kapoor

माझी प्रथमिकता चांगल्या दिग्दर्शकासोबत काम करण्यासाठी असते कारण सिनेमा निर्माण करणं हे एक टीमवर्क आहे. चांगल्या टीमसोबत काम करताना तुम्ही तुमचा सर्वश्रेष्ठ परफॉरमन्स देता.

5/5

Sonam Kapoor

Sonam Kapoor

अभिनेत्री सोनम कपूरचा आगामी 'पॅडमॅन' सिनेमा २५ जानेवारी रोजी रिलीज होणार आहे. त्यानंतर १ जून रोजी 'वीरे दी वेडिंग' या सिनेमातही सोनम कपूर पहायला मिळणार आहे. (सर्व फोटो सौजन्य: इंस्टाग्राम)