Suhana Khan Net Worth: वयाच्या 24 व्या वर्षी शाहरुख खानची लाडकी आहे कोट्यवधींची मालकीण, सुहानाच्या बॉयफ्रेंडसाठी वडिलांचे आहेत 'हे' 7 नियम

Suhana Khan Net Worth : स्टार किड्सपैकी एक असलेली सुहाना खान हिचा आज 24 व्या वाढदिवस आहे. तिच्या संपत्तीचा आकडा ऐकून तुम्हाला नक्कीच धक्का बसेल. 

May 22, 2024, 13:02 PM IST
1/7

किंग खान आणि गौरी खानची लाडकी लेक सुहाना खान हिच्या वाढदिवसानिमित्त तिच्यावर बॉलिवूड सेलिब्रिटींपासून ते सर्वसामान्यांपर्यंत सर्व शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. 

2/7

द आर्चीज चित्रपटातून डेब्यू करणाऱ्या सुहाना कोट्यावधींची मालकीण आहे. तिच्याकडे कार कलेक्शनपासून महागडे कपडे, बॅग आणि आउटफिट्सपर्यंत सर्व काही अजून ती आलिशान जीवनशैली जगते. 

3/7

सुहाना खानचे न्यूयॉर्कमध्ये स्वतःचे एक आलिशान घर आहे, ज्याची किंमत सुमारे 35 कोटी रुपये इतकी आहे. शिवाय अलिबागमध्येही जमीन अजून त्याची किंमत 10 कोटी रुपये आहे. 

4/7

सुहाना सौंदर्य उत्पादनाची ब्रँड ॲम्बेसेडर असून त्यातून ती करोडो रुपये कमावते. कोइमोईच्या अहवालानुसार, तिची संपत्ती ही 13 कोटींच्या घरात आहे. आलिशान घराशिवाय तिच्याकडे रेंज रोव्हर आणि लॅम्बोर्गिनी आहे. 

5/7

सुहाना लहानपणापासून वडील शाहरुखसोबत फिरताना दिसली आहे. आयपीएलच्या मॅचमध्ये टीमचं मनोबल वाढवताना ती दिसून आला आहे. 

6/7

अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदासोबत सुहाना खान रिलेशनमध्ये आहे अशी चर्चा आहे. एकदा फेमिना मॅगझिनशी मुलाखत देताना शाहरुख खाने सुहानाच्या बॉयफ्रेंडसाठी सात नियम आहेत असं सांगितलंय. 

7/7

शाहरुख खानचे नियम असे आहे की, नोकरी शोध, हे समजून घे तू मला आवडत नाही, मी प्रत्येक ठिकाणी आहे, एक वकील करुन ठेव, ती माझी राजकुमार आहे, तुझा विजय नाही, मला तुरुंगात जाण्यात काही अडचण नाही आणि तू जे तिच्यासोबत करशील ते मी तुझ्यासोबत करेल.