15 वर्ष लहान बॉयफ्रेंडसोबत दिवाळी पार्टीमध्ये पोहोचली सुष्मिता सेन

Nov 05, 2018, 11:29 AM IST
1/5

शिल्पा शेट्टीने दिवाळीनिमित्त ठेवलेल्या पार्टीला बॉलिवुडच्या अऩेक कलाकारांनी हजेरी लावली. पण सगळ्यांचं आकर्षण ठरले ते बॉलिवूडचं नवं लव-बर्ड अभिनेत्री सुष्मिता सेन आणि तिचा नवा बॉयफ्रेंड मॉडल रोहमन शॉल.

2/5

दोघांनी एकाच रंगाचा ड्रेस देखील घातला होता. दोघांनी मीडियासमोर पोस्ट देखील दिल्या. सोशल मीडियावर दोघांचा व्हिडिओ देखील व्हायरल होत आहे.

3/5

पहिल्यांदाच हे दोघं एकत्र दिसलेले नाहीत. नेहमी एअरपोर्ट या दोघांना एकत्र पाहिलं गेलं आहे. रोहमनचं सुष्मिताने दत्तक घेतलेल्य़ा मुलींसोबत देखील चांगलं जमतं. काही दिवसांपूर्वी सुष्मिता सेनने तिच्या इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला होता. ज्य़ामध्ये सुष्मिताची मुलगी रिनी आणि रोहमन एकत्र दिसत होते.

4/5

 सुष्मिताच्या आयुष्यात अनेक जण आले आणि गेले. पण आता ती रोहमनसोबत विवाह करण्याचा विचार करत असल्याचं दिसतं आहे.

5/5

संजय नारंगसोबत ब्रेकअप झाल्य़ानंतर सुष्मिता सुबीर भाटिया सोबत अनेक दिवस दिसत होती. सुबीर भाटियानंतर ती रणदीप हुड्डा सोबत देखील रिलेशनमध्ये असल्याची चर्चा होती. त्यानंतर सुष्मिता तिचा मॅनेजर बंटी सचदेवासोबत रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा रंगल्या.

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by clicking this link

Close