
सिंह
सिंह
१ मे - ३१ मे २०१३
तुम्ही जितक्या प्रगतीचा विचार केला होता. तेवढी प्रगती तुम्हांला या महिन्यात दिसून येईल. ज्यामुळे आपल्याला मान, सन्मान आणि प्रतिष्ठा प्राप्त होईल. तुमच्या कार्यक्षेत्रात अथवा व्यावसायिक क्षेत्रात चांगलाच विस्तार घडवून आणाल. तुम्हांला धनप्राप्ती व्हावी याकडे तुमचे लक्ष लागून राहिलेले असेल. तुम्ही या स्पर्धेच्या युगात कधीही मागे राहणार नाही. त्यामुळे तुमच्या सोबत तुमचं कुटुंबदेखील चांगली प्रगती करेल. पण यासाठी मात्र तुम्हांला कठोर परिश्रम करावे लागणार आहे. तुमच्या राशीचा स्वामी सूर्य आहे. ज्यामुळे तुम्ही तुमच्या विरोधकांचा जोर नक्कीच कमी करू शकता. यावेळेत मात्र तुम्हांला मानसिक त्रास येण्याची शक्यता आहे. पण योग्य वेळी तुम्ही तुमच्या क्षमतेचा वापर करून परिस्थितीवर मात करू शकाल.
First Published: Thursday, May 02, 2013, 16:23