कन्या


कन्या
कन्या

१ मार्च ते ३१ मार्च २०१४

महिन्याच्या सुरुवातीला मंगळ कन्या राशीत आहे, रवि, बुधतृतीयात आणि गुरु दशमात आहे.द्वितीयभावात शनि, राहू असल्याने एका बाजूने तुम्हाला काही लाभ होण्याची शक्यता आहे, पण तोच पैसा दुसऱ्या मार्गाने बाहेर जाण्याची पण तेवढीच शक्यता आहे. त्यामुळे व्यवहार जपून करावेत. काही लोकांना बदलीचे पण योग आहेत. महिन्याच्या उत्तरार्धात एखाद्या धार्मिक स्थळी भेट देण्याचा प्रसंग येण्याची शक्यता आहे. लेखक मंडळींच्या लेखनाला बऱ्यापैकी प्रतिसाद मिळेल. पैशाची आवक मात्र थोड्याफार फरकाने होतच राहील.संपूर्ण महिनाभर अष्टमेश मंगळ लग्नी असल्याने काहीतरी चिंता किंवा उष्णतेचे विकार होण्याची संभावना आहे.