
कुंभ
कुंभ
१ मे २०१३ - ३१ मे २०१३
तुमचे सर्व ग्रह पराक्रम स्थानात असल्याने तुम्ही असाधारण गतीने काम करणार तसेच वरच्या पदावर पोहण्याची इच्छा जागृत होऊ शकते. छोटे मोठे प्रयत्न आणि परदेशात जाण्यासंबंधी बाबी आता लगेच मार्गी लागणार नाही. पण काही काळानंतर या गोष्टी मार्गी लागतील.
बऱ्याच काळानंतर अशा काही घटना घडतील की तुमच्या कामातील अडचणी दूर होतील. निर्भरता आणि जोखीम पत्करण्याची तुमची क्षमता वाढेल. समृद्धी प्राप्त करतांना संकल्पासोबत गंभीरता आवश्यक आहे. तुमचे धेय आणि कामांची सांगड घालणे गरजेचे आहे. तुम्ही उर्जावान राहणार, त्यामुळे तुमची प्रशंसा होईल आणि विरोधकांपासून पुढे जाण्यास मदत होईल.
पैसा, प्रसिद्धी आणि परिवार तुमच्यासाठी नेहमी महत्वाचे राहिले आहे. कर्ज आणि गुंतवणूक हे देखील तुमच्या दृष्टीने महत्वाचे असणार आहे.
First Published: Thursday, May 02, 2013, 16:23