
धनु
धनू – तुमचे तारे चमकतील
तुमच्यासाठी २०१३ हे वर्ष सुरुवातीला थोडं झंझावाती राहील पण जानेवारीनंतर मात्र तुम्हाला शांती मिळू शकेल. अडचणींवर सहज मात करता येईल. सगळ्याच क्षेत्रात प्रगती दिसून येईल. आर्थिक रुपानं हे वर्ष थोडं अडचणींचं जाण्याची शक्यता आहे. वर्षाच्या पहिल्या तीन महिन्यांनंतर तुमच्या आर्थिक स्थीतीमध्ये सुधारणा घ़डून येईल. आपल्या रागावर नियंत्रण ठेवा. त्यामुळे गोष्टी आणखीन बिघडण्याची शक्यता आहे. यावेळी कोणत्याही प्रकारची रिस्क घेऊ नका. स्पर्धात्मक जगात तुमचा प्रभाव थोडा कमी पडेल पण सामाजिक क्षेत्रात तुम्ही पाऊल ठेवल्यानंतर तुमचा प्रभाव यशस्वीपणे समोर येईल. पार्टी-उत्सवांमध्ये तुम्ही केंद्रभागी असाल. नवे मित्र बनवू शकाल.
वर्षातील पहिल्या तीन महिन्यांमध्ये तुम्हाला स्वास्थ्यासंबंधी तक्रारी जाणवतील. पण त्यानंतर मात्र आराम मिळेल. व्यवसायामध्ये गुंतवणूक करताना सावधानता बाळगा अन्यथा नुकसान सोसण्यासाठी तयारी ठेवा. मुलांमुळे थोड्या अडणींचा सामना करण्याची तयारी ठेवा. यशस्वीतेकडे घेऊन जाण्यासाठी बुध तुम्हाला मदत करेल. खर्च होण्याच्या अनेक शक्यता आहेत. पहिल्या तीन महिन्यांत दिखाऊपणासाठी जास्त खर्च होईल. या दरम्यान प्रेमाच्या व्यक्तींपासून दूर जाण्याची शक्यता आहे. पण, वर्षातील दुसऱ्या टप्प्यात सर्व सुरळीत होईल. लग्नासाठी ही वेळ योग्य आहे. एकूणच या वर्षाची सुरुवात थोडी सुस्त असली तरी पहिल्या तीन महिन्यानंतर प्रगती होईल. खर्च करण्याआधी योजना बनवा. मित्रपरिवाराबरोबर वेळ चांगला जाईल.
First Published: Tuesday, January 01, 2013, 00:24