कुंभ

या महिन्यात तुम्हांला वडील आणि मित्रांचा सहवास प्राप्त होईल. त्यांच्याकडून फायदा होण्याची शक्यता आहे. नोकरीमध्ये सहकाऱ्यांच्या मदतीने कार्य संपन्न होईल. वरिष्ठ तुमच्या कामाची प्रशंसा करतील. कामासंबंधी खर्च होणार. वैभवी जीवन शैली आणि वाहन सुख मिळेल. छोट्या प्रवासाची आणि पर्यटनाची शक्यता आहे. तुमच्या मुलांशी ताळमेळ वाढेल. उच्च शिक्षण घेण्यासाठी तुम्ही प्रयत्न करीत असाल तर प्रयत्न फळाला येतील. विद्यार्थ्यांसाठी प्रगतीचा काळ आहे. धर्म आणि तंत्र-मंत्रात तुमची रुची वाढेल. जरा डलनेस जाणवले. व्यापार आणि व्यवसायासंबंधी प्रवास घडेल. घरातील सुख-सुविधा वाढविण्यासाठी खर्च वाढतील. या महिन्यात राहू आणि केतू राशी परिवर्तनात आपल्या जीवनावर प्रभाव टाकेल.