मेष

आपल्या जन्म राशीत शनी आठव्या स्थानावर आहे, शनीचं भ्रमण नोव्हेंबर महिन्यापासून सुरू होणार आहे, ज्याचा परिणाम आताच दिसून येणार आहे, महिन्याच्या सुरूवातीला तुम्हाला सर्व प्रकारच्या चढ-उताराचा सामना करावा लागेल, व्यवसायात धैर्य ठेऊन पुढे जावं लागेल. तुम्ही आयात-निर्याताच्या क्षेत्रात असाल तर जास्त सावध राहण्याची गरज आहे. महिन्याच्या दुसऱ्या पंधरवाड्यात तुम्ही जमीनीचे व्यवहार कराल, सरकारी कामाला वेग येणार आहे, लग्न जमण्याचे योग आहेत. शेअरबाजारात दीर्घकाळासाठी गुंतवणूक करा.