कर्क

महिन्याच्या सुरुवतीला तुम्हांला चांगल्या वस्तूंची प्राप्ती, खरेदी, चांगल्या गोष्टी कानावर पडतील. यश आणि उत्पन्नासाठी शुभ संकेत मिळतील. मुलांविषयी काम होतील. धार्मिक किंवा मंगल कामांसाठी चांगली वेळ आहे.

तुम्ही कठोर पणाचा मार्ग सोडून संयम राखणे आवश्यक आहे ही वेळ मानसिक तणाव दूर करण्याची आहे. विचार पूर्वक पुढे जाण्याचा सल्ला घ्या. आवडत्या व्यक्तिबरोबर फिरायला जाण्याची संधी आहे.

महिन्याच्या शेवटच्या टप्प्यात परिवारातील मुद्द्यांवर लक्ष केंद्रित होईल. कार्यक्षेत्रानुसार तुम्ही उत्साहाने काम कराल.