मकर

हा महिना तुमच्यासाठी फलदायी ठरणार आहे. रोजच्या कामात आणि व्यवसाय क्षेत्रावर लक्ष केंद्रीत करून विशेष ध्यान देणार आहे. या काळात तुमची लेखन क्षमता आणि कला उठून दिसेल. बौद्धिक आणि तार्किक विचार विनिमय होणार आहे. भागीदारीत फायदा होईल. समाजात सन्मान आणि नाव लौकिक वाढेल. सुखी दाम्पत्य जीवनाचा आनंद घेऊ शकाल. अविवाहीतांना चांगले स्थळ सांगून येतील. परदेशात जाण्यातील अडथळे दूर होतील. आहारमुळे तुम्हांला आरोग्य संबंधी समस्या निर्माण होतील. पाणी आणि बोलण्याचा वापर सावधानतेने करा. कामात सहकाऱ्याची मदत मिळेल. ईश्वर आराधना आणि ध्यान लावण्याने मन शांत होईल. धार्मिक संस्थाशी जोडलेल्या लोकांना फायदा होईल. नोकरी करणाऱ्यांची प्रगती होईल.