मिथुन

महिन्याची सुरूवात शुभ आणि भाग्योदय करणारी आहे. गोडबोलून आपण आपला कार्यभाग साधू शकता. तुमचं ठरलेलं काम पूर्ण झाल्याने, आत्मविश्वास वाढणार आहे. विविध क्षेत्रात तुमच्या कार्यकौशल्याने तुम्ही लोकांना आकर्षित करणार आहात. चाकरमान्यांनी कार्यालयातील लोकांना नाराज करू नये, कारण आपल्या यशाच्या मार्गात अडचणी निर्माण होऊ शकतात. विद्यार्थ्यांनी सुसंगत वाढवावी, नवीन कामं हाती घ्यावीत, एखाद्या व्यक्तीविषयी आकर्षण निर्माण होणे स्वाभाविक असलं, तरी विचारपूर्वक निर्णय घ्यावा, आरोग्याची हेडसांड होणार नाही याकडे लक्ष द्या, कामाचा बोझं वाढेल, कामं वेळेवर पूर्ण झाली नाहीत तर चिडचिड होणार नाही याची काळजी घ्यावी. मित्र आणि मैत्रिणींकडून मदत होईल.