तूळ

या राशींच्या व्यक्तींना महिन्याची सुरूवात चांगली नाहीय. मात्र महिन्याचा शेवट खूप चांगला होणार आहे. महिन्याच्या पहिल्या पंधरवाड्यात घरात वडील किंवा मोठ्या व्यक्तींसोबत मतभेद होण्याची शक्यता आहे. यावेळी आपल्या आरोग्यावरही विशेष लक्ष ठेवावं लागेल. नाहीतर जुन्या व्याधी पुन्हा बळावू शकतात. 
वाहन आणि मशीन चालवतांना सावधगिरी बाळगा, नाहीतर जखम होऊ शकते. अध्यात्माकडे आपली रूची अधिक वाढेल. अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे.

महिन्याच्या उत्तरार्धात आपण उल्लेखनीय प्रगती कराल आणि चांगल्या कमाईच्या संधी मिळतील. लाल रंगाच्या वस्तूंचा व्यापार केल्यास आपल्याला नफा मिळेल. भाग्याची सोबतही चांगली मिळेल. आपली महत्त्वाकांक्षा वाढेल. वाईट सवय लागण्याची शक्यता आहे. त्यामुळं सांभाळा... कला क्षेत्र, कॉस्मेटिक, सजावट, स्पा, सौंदर्य प्रसाधन इत्यादींचा व्यवसाय करणाऱ्यांना फायदा होण्याची शक्यता आहे.