मीन

या महिन्यात तुमची बुद्धिमत्ता आणि कार्यकुशलतेचा प्रभाव सर्वांना दिसेल. तुमच्या संपत्तीसंबंधी प्रश्नावर सकारात्मक परिणाम दिसून येतील. सरकारी कामकाज, आरोग्य विषयी व्यवसाय आणि सिमेंट उद्योगात तुम्हांला यश मिळेल. गेल्या अनेक दिवसांपासून पेंडिग असलेले कामं किंवा प्रोजेक्ट पूर्णत्वास येतील त्यामुळे तुमच्यावरील भार कमी होईल. धन प्राप्तीची लालसा वाढण्याची शक्यता आहे. त्यापासून स्वतःला दूर ठेवाल. मित्र आणि कुटुंबाकडून तुम्हांला प्रत्येक कार्यात मदत मिळेल. महिन्याच्या उत्तरार्धात गेल्या अठरा महिन्यांचा शापित दोष संपणार आहे. त्यामुळे कार्य पूर्ती होईल आणि नकारात्मकता कमी होईल. कौटुंबिक जीवनात किंवा भागीदारीत आक्रमकता ठेवून नका, त्याने तुम्हांला लाभ होईल. अभ्यासावर विशेष लक्ष द्या.