धनु

हा महिना आपल्यासाठी संमिश्र आहे. अनेक गोष्टी या महिन्यात घडणार आहे. गुरुचे पाठबळ असल्याने तुम्हाला अडचण येणार नाही. मात्र, तुम्ही सावधान राहिलात तर तुम्हाला कठीणतेचा सामना करावा लागणार नाही. जर असे केले नाही तर तुम्हीच त्याला जबाबदार राहाल. तुम्ही नेहमी गोड बोला. अन्यथा तुमच्या बोलण्यामुळे अनेक जण दुखावले जाण्याची शक्यता आहे. मसालेदार पदार्थ कमी खा. अधिक परिश्रम करुन तुम्हाला चांगले फळ मिळणार नाही. तुम्ही निराश होण्याची शक्यता आहे. तुमचे आई-वडिलांशी मतभेद होण्याची शक्यता आहे. जमीन, घर याबाबतीत तुम्हाला सुख मिळेल.