वृश्चिक

जूनच्या सुरुवातीला आपण व्यवसायात मग्न असाल. वैवाहिक जीवनात तुम्ही अधिक लक्ष देऊ शकणार नाही. तसेच भागिदारी संबंधित आपले काम हळू गतीने पुढे सुरु राहिल. तुम्ही धार्मिक यात्रा करण्याची शक्यता आहे. या महिन्यात तुम्ही ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेण्याचा योग संभवतो. परदेशातील व्यक्तींशी  भागिदारी करताना तुम्ही सावधनता बाळगा. आयात-निर्यातीत आपल्याला अनुकुलता असेल. महिन्याच्या उत्तरात आठव्या स्थानात सूर्य प्रवेश करील. त्यामुळे तुम्हाला धन लाभ होण्याची शक्यता आहे. घरातील मोठ्या व्यक्तींची तब्बेत बिघडण्याची शक्यता आहे. त्यामुळे पैसे खर्च करावे लागतील. आपल्याला डोळ्यांसंबधी आजार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे खबरदारी घ्यावी. घरात एकादे चांगले कार्य तसेच धार्मिक कार्य होण्याची शक्यता आहे. आपल्याला भाग्य लाभ मिळेल. आपला सामाजिक मान-सन्मात वाढेल.