वृषभ

या महिन्यात तुमच्या डोक्यात क्रांतीकारी विचार फिरत असलेले तुम्हाला जाणवतील. तुम्हाला आनंददायी तसंच रोमांचक यात्रेवरही जाण्याची संधी मिळू शकेल. परदेशी जाण्याची इच्छा असेल तर तयारी करायला हरकत नाही. संवाद साधताना स्पष्टता ठेवा. 

त्वचारोगाचा सामना तुम्हाला करावा लागू शकतो. दीर्घकालीन कामं वेळीच मार्गी लागतील. याचा तुम्हाला पुढे फायदा होईल आणि तुम्हाला सफलताही मिळेल. धार्मिक कार्यांतही लक्ष गुंतवाल. महिन्याच्या शेवटी सट्टेबाजीपासून दूर राहा.