कन्या

या महिन्याच्या सुरुवातीला आर्थिक व्यवहारांमध्ये जरा काळजी घ्या. कोणत्याही कामात घाईघाईन उडी मारण्याआधी जरा विचार करा. सध्या घर आणि वाहनाचे कागदपत्र तयार करू नका. आई-वडील किंवा घरातील वृद्धांच्या तब्येतीची काळजी घ्या. विद्यार्थ्यांसाठी हा काळ जर कठीणच आहे. अनेक महत्त्वपूर्ण कामं उशीरानं होण्याची शक्यता आहे. महिन्याच्या अखेरीस कुटुंबियांसोबत प्रवासाचे योग आहेत. वैवाहिकांसाठी उत्तम दाम्पत्यसुखाचा काळ.