कर्क

कर्क - जसं कराल तसं तुम्ही याच वर्षी भराल

कर्क राशीच्या व्यक्तींसाठी हे वर्ष संमिश्र आहे. या वर्षात तुम्हाला खूप काही शिकण्यासारखे आहे. यावर्षात तुम्हाला तुमचा प्रामाणिकपणा आणि तुम्ही योग्य आहात का, हे दाखवून द्यावे लागेल. २०१४मध्ये जुलै महिन्यापर्यंत ज्यादातर ग्रह आणि नक्षत्र आपले आरोग्य, करिअर आणि आर्थिक स्थितीसाठी प्रभावशाली नाही. आपण आपल्या अनुभवावर आणि अनुमानावर आधारित स्थिती चांगली करण्याचा प्रयत्न कराल. आपल्याला आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवावे लागेल. त्यामुळे जीवनात येणाऱ्या अनेक गोष्टींवर नियंत्रण मिळवू शकाल. अनावश्यक भीती आणि चिंता यापासून मुक्ती मिळण्यासाठी तुम्ही सकारात्मक राहायला हवे. चौथ्या घरात शनिची स्थिती २ नोव्हेंबरनंतर चांगली असेल. यावर्षात तुम्हाला लग्नाचा योग आहे. त्याप्रमाणे तुमच्या मनात बदल होण्याची शक्यता आहे. कारण गुरू पहिल्या स्थानात पोहोचेल. त्यामुळे आपल्या जीवनात बदल घडून येण्याची शक्यता आहे. २०१४ साल आपल्याला कामात खूप व्यस्त ठेवील. हे वर्ष आपल्यासाठी खास नाही. मात्र, तुम्ही केलेल्या पहिल्या कार्याच्या जोरावर चांगले रिझल्ट मिळेल.