मकर

वर्ष २०१६ हे तुमच्यासाठी चांगलं असणार आहे, या वर्षी तुम्ही एका नव्या उंचीपर्यंत जाणार आहे, धन-धान्य संपन्न होणार आहात, घरात समृद्धी येणार आहे. करिअरच्या बाबतीत यावर्षी काहीसे चांगले परिणाम असतील. 

प्रेमसंबंध आणि नको ती कामं करून आपण आपल्या करिअरचं नुकसान करू शकतात. लव्ह लाईफबद्दल या वर्षी तुमचा अप्रोच नॉर्मल असणार आहे. यावर्षी तुम्हाला घरातून तसेच मित्र परिवारातून पूर्ण मदत होणार आहे. 

ठरवलेलं लक्ष्य आधीच मिळाल्याने, मन समाधानी असणार आहे. कुठून तरी एखादी अशूभ बातमी येऊ शकते. प्रेमाच्या काही गोष्टींमुळे घरात तणाव वाढू शकतो. वाहन काळजीपूर्वक चालवा. घरात पुजेमुळे धार्मिक वातावरण असेल. तुम्ही विवाहीत असाल, तर तुमची मुलं तुम्हाला या वर्षी आनंद देतील. अनोळखी व्यक्तीवर विश्वास टाकल्याने नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही.