मिथुन

या राशीतील व्यक्तींनी पूर्ण तयार राहायला हवे. त्यांना २०१५ या वर्षात अनेक चांगले आणि लाभदायक गोष्टींना सामोरे जावे लागेल. गुरूच्या दुसऱ्या घरात प्रवेशाने तुमच्या उत्पन्नात वाढ होईल. तुमच्या इच्छा पूर्ण होण्याची शक्यता आहे. डोळ्याचे तेज वाढेल आणि वकृत्व क्षमता वाढेल. या वर्षी भाग्य तुम्हांला बरेच काही देऊ शकते. आपल्या वजनासंबंधी सावधानता बाळगा. खाण्यापिण्याच्या सवयी तुम्ही जास्त लक्ष देणार नाही. कामात तुमच्या सहकाऱ्यांशी स्पर्धा करावी लागले. तुमच्या हातात अनेक प्रोजेक्ट येतील. योगासनाने दबाव आणि वर्कलोड कमी करण्यात मदत मिळेल. यश आणि प्रसिद्धी आपल्या जीवनात प्रवेश करणार आहे. तुमच्या धाडसात वाढ होईल. छोटा प्रवास, शेजारी आणि भाऊ-बहिणींशी संबंध सुधारतील. तुमचे भाऊ-बहिण त्यांना मिळालेल्या यशामुळे तुम्हांला अभिमानाची संधी मिळेल. कला, संगीत आणि अभिनय तुम्हांला आकर्षित करतील. तुम्हांला यात रुची वाढून तुम्ही एखादा क्लास जॉइन करण्याची शक्यता आहे. 

सहाव्या घरात शनि असल्याने कार्यक्षेत्रात हार्डवर्क आणि अधिक शिस्तीमुळे अधिक फोकस होण्यात मदत होईल. नवी संधी, नवीन कर्मचारी भरती, विरोधीशी सामना करण्यासाठी उपयुक्त सिद्ध होणार आहे. तुम्हांला कायदेशीर बाबतीत पाऊल उचलावे लागण्याची शक्यता आहे. वर्षाच्या दुसऱ्या भागात राहुचा चौथ्या घरात प्रवेश करणार असल्याने परदेश प्रवासाची शक्यता वाढू शकते. त्यामुळे आईसोबत काही चांगले क्षण घालवा आणि तिच्यासाठी वेळ काढा. अधिक खर्च तुम्हांला तणाव देऊ शकतो, त्यामुळे विचार करून खर्च करा.