सिंह

सिंह राशीच्या व्यक्तींसाठी २०१५ वर्ष प्रत्येक क्षेत्रात चांगले जाणार आहे. या वर्षी आपण आपल्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. तुमच्या आत्मविश्वासात वाढ होईल. त्यामुळे तुमच्या संधीची कवाडे उघडतील. या वर्षी तुमचे आरोग्य चांगले राहणार आहे. तरीही खाण्यापिण्याच्या सवयीवर नियंत्रण ठेवा. तुमची लोकप्रियता एका चमकत्या ताऱ्याप्रमाणे तुम्हांला ओळख मिळवून देईल. तुमच्या आत्मविश्वासाला नवी उभारी मिळेल. जे लग्नासाठी इच्छूक आहेत त्यांना शुभ मुहूर्त सापडेल. गुरूच्या ७ व्या स्थाना प्रवेशाने व्यापार आणि नेटवर्किंगमध्ये फायदा होईल. वर्षाच्या सुरूवातीच्या मनोरंजन आणि खेळ क्षेत्रात गुंतवणूक करणे लाभदायक ठरेल. 

राहूचा कन्या राशीत प्रवेशाने मीडिया, मार्केटिंग, सेल्स, टॅव्हल, आर्ट, रायटिंग आणि कम्युनिकेशन क्षेत्रात अधिक फायदा मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या भावांशी किंवा नातेवाईकांशी असलेले वाद-विवाद बसून सोडवा. शनिचा वृश्चिक राशीत प्रवेश केल्याने सोशल नेटवर्किंग, डिझायर आणि फायद्यात विलंब होईल.