तूळ

तूळ राशीच्या व्यक्तींसाठी हे वर्ष आनंददायी आणि लाभदायक असेल. या राशीत जन्मलेल्या व्यक्तींना हे वर्ष करिअर आणि वाढीसाठी उत्तम ठरेल. २०१५ सालात तुम्ही खूप प्रगती कराल. तुमच्या उत्पन्नात वाढ होईल. क्रय शक्ती वाढीस लागेल. संबंधात मधुरता येईल. नवीन जॉब शोधत असाल किंवा प्रमोशनची इच्छा असेल तर तुमच्या दोन्ही इच्छांसाठी हे वर्ष तुमच्यासाठी फायदेशीरच ठरणार आहे. कायदेशीर, डावपेच, शत्रूत्व इत्यादी प्रकरणांत विजय तुमचाच होईल. 

वर्षाच्या सुरुवातील स्थिती थोडी बिघडू शकते. तुमच्यासमोर अनेक आव्हानं उभी राहू शकतात. पण, त्यांचा सामना करून त्यांच्यावर तुम्ही विजय मिळवू शकाल. यामुळे तुमच्या व्यक्तीमत्वात धैर्य आणि लवचिकता पाहायला मिळेल. अनेक अडचणींवर तुम्ही सहजगत्या मात कराल. जोडीदारासोबत नातं संवेदनशील राहील. नात्यांमध्ये काही काळ खट्टूपणा येण्याची शक्यता आहे.  

प्रेमाची देवता समजल्या जाणाऱ्या शुक्राचं वरदान तुम्हाला लाभेल ज्यामुळे तुमचं आयुष्य रोमान्टिक असेल. प्रेमाच्या या प्रवासासाठी तयार राहा. एक साधा मेकओव्हार, नवा हेअरकट तुमच्यात नवीन ऊर्जा निर्माण करेल. वर्षाचा दुसरा अर्धा भाग तुमच्यासाठी जास्त लाभदायक ठरेल... भाग्यशाली ठरेल. कठोर परिश्रम तुमच्यामध्ये सकारात्मकता निर्माण करेल. 

शांत राहा... वाद टाळा... हाच मंत्र तुमच्यासाठी उत्तम राहील. एकूणच २०१५ हे वर्ष तुमच्यासाठी लाभदायक ठरेल. तुम्ही तुमचं जीवन कसं प्लान करताय यावर सर्व काही अवलंबून आहे.