धनु

धनू - २०१५मध्ये गुरु कर्क राशीच्या आठव्या स्थानात प्रवेश करील. हा आपल्या बदलासाठी सूचक आहे. आपण बॅंकिंग, कर्ज, भागिदारी, गुंतवणूक आदींमध्ये तुम्ही  भाग्यशाली ठराल. गुरु १२ व्या स्थानात आहे. त्यामुळे तुमची धार्मिक आवड दिसून येईल. धार्मिक यात्रा करण्याची शक्यता आहे. तुम्हाला परदेशात जाण्याची संधी प्राप्त होईल. त्यामुळे तुम्ही आधीच तयारी करुन ठेवा. जे परदेशात सेटल होण्याची विचार करीत आहेत. त्यांना हे साल चांगले आहे. तुमच्यामध्ये अचानक होणारा बदल तुमच्या कुटुंबासाठी प्रभावित ठरु शकतो.

पैसा आणि आर्थिक देणेघेणे याबाबत तुम्ही जी काही समस्या येईल ती तुम्ही सहज सोडवू शकता. ती  सहज हाताळू शकता. तुम्हाला यावर्षी आर्थिक लाभ होईल. त्यामुळे तुम्ही कर्ज मुक्तीतून तुमची सुटका होईल.   आपण आहार आणि सवयी यांबद्दल काळजीपूर्वक विचार करा. एखादी मालमत्ता तुमची होण्यासाठी योग्य संधी आहे.  आपल्या स्वप्नातील घर यावर्षी पूर्ण करणे शक्य आहे.  पूर्वी पेक्षा आईबरोबरच्या संबंधाबाबत सुधारणा होईल.

शनी या वेळी वृश्चिक राशीच्या १२ व्या ग्रहात पव्रेश करील. या स्थितीमुळे आपल्यावर अधिक जबाबदाऱ्या येतील. तसेच आर्थिकबाबती तुमचे समाधान होईल. आपल्या सवयीबाबत काळजी घेण्याची गरज आहे. रोमॅंटींग संबंधामुळे अचडणीत येण्याची शक्यता आहे. मात्र, आपल्यासाठी रोमॅटींग संबंध तुमच्यासाठी चागंले ठरु शकतात. या वर्षाच्या दुसऱ्या सहामाहीत गुरुचा प्रवेश सिंह राशीत होईल. यादरम्यान, आपल्याला धर्म, वडील, शिक्षक, शिक्षण, लांबचा प्रवास याबाबतीत तुम्हाला ते चागंले ठरु शकते. यामुळे तुमचे आरोग्य चांगले राहील. आपण अधिक आत्मविश्वासाने आणि ऊर्जा युक्त राहाल. विद्यार्थ्यांसाठी हे साल भाग्यशाली असेल. ही वेळ आपल्यासाठी सकारात्मक राहिल. नविन लोकांशी ओळख होईन तुमचे संबंध अधिक चांगले राहतील.

एकंदरीत २०१५ साल आपल्या व्यक्तिगत जीवनात मोठे बदल घडवून आणील. भविष्यात होणाऱ्या खर्चाची तुम्ही आधीच तरतुद करण्याची गरज आहे. बोलताना तुम्ही सावधानता बाळगा. आपण तणाव मुक्त राहा. त्यामुळे तुमचे आरोग्य चांगले राहील. २०१५मधील दुसरे सत्र तुमच्यासाठी चांगले आहे. यादरम्यान, तुम्हाला चांगला लाभ होईल. पदेश प्रवास होण्याची शक्यता आहे.