वृषभ

वृषभ राशीच्या व्यक्तींना या वर्षी २०१५ मध्ये एक उल्लेखनीय सुरूवात होणार आहे. गुरू तिसऱ्या घरातून जाणार असल्याने कम्युनिकेशन, धाडस, छोटे प्रवास, लेखन, सेल्स, मीडिया संबंधी प्रकरणात सकारात्म विस्तार होईल. कला, अभिनय आणि संगीताची आवड असल्यास शिकण्यासाठी क्लास जाइन करण्याची शक्यता आहे. लग्न आणि भागिदारी संदर्भात सातव्या घरात गुरू असल्याने लाभ होईल. त्यामुळे रोमान्स आणि प्रेम वाढेल. 

गुरूच्या नवव्या घरातील प्रभावामुळे वडील, शिक्षक, लांबचा प्रवास आणि धार्मिक प्रकरणात चांगला परिणाम पाहायला मिळेल. परदेश प्रवास मागच्या तुलनेत अधिक सहजतेने होईल, त्यामुळे संधी दवडवू नका. गुरू ११ व्या घरात असल्याने प्रगती होईल. तुमच्या उत्पन्नात वाढ होईल. तसेच अधिक लाभ मिळणार आहे. तुमचे नेटवर्क आणि मैत्री वाढण्याची शक्यता आहे. सातव्या घरात शनि असल्याने विवाह आणि भागिदारीबाबत काही विलंब होऊ शकतो. चिंता करू नका, या कालावधीत धैर्य आणि अनुशासनाने तुम्हांला प्रेरीत करणार आहे. 

लव आणि क्रिएटिव्हीटी संबंध पाचव्या घरात राहू तुम्हांला उत्साहासह स्थिरता देणार आहे. तुमच्या रोमांटिक प्रयत्नात सत्यता राखा तसेच संबंधात सावधानता राखा. कामात दबाव बनण्याची शक्यता आहे. खटल्यांमध्ये किंवा बिझनेसच्या प्रतिस्पर्ध्यांबाबत विजय मिळेल. आरोग्य, खानपान, व्यायाम योग्य काळजी घेऊन उर्जावान बनण्याचा प्रयत्न करा. आपल्या आरोग्याची नियमित तपासणी करा. 

वर्षाच्या दुसऱ्या भागात गुरू सिंह राशीत प्रवेश करणार असल्याने त्याने सुख समोर येतील. तुमच्या आईसाठी हे लाभदायक असेल. रिअल इस्टेट प्रकरणात चांगले दिवस येणार आहे. गुरूचा चौथ्या घरातील प्रवेशाने उच्च शिक्षणात मदत होईल. नवे घर किंवा नवीन कार खरेदी करण्याची संधी मिळेल. गुरूच्या आठव्या घरातील प्रभावामुळे भविष्य, भौतिकी, खगोलशास्त्र आणि मनोविज्ञान संबंधी कल वाढेल.