कन्या

बृहस्पतीची अकराव्या घरावर विशेष कृपा राहील यामुळे तुम्हाला अनेक लाभ संभवतात. तुमच्या अनेक इच्छाही यामुळे पूर्ण होतील. तुमच्या सामाजिक आणि नेटवर्क सर्कलमध्ये मोठा विस्तार तुम्हाला पाहायला मिळेल, यामुळे तुम्ही खूपच आनंदी असाल. लव्ह अफेअर्स, मुलं, मनोरंजन, खेळ इत्यादींमध्येही तुम्हाला आनंद मिळेल. 

ही वेळ तुमच्यासाठी खूपच चांगला ठरेल. कुटुंबियांशी उत्तम नातं, भावंडांसोबत विशेष संबंध बनवू शकाल. पण, स्वास्थ्यासंबंधी काळजी घ्या. वर्षाच्या सुरुवातीला जोडीदारासोबत मधूर संबंध ठेवा. शुक्रच्या प्रभावामुळे खाजगी जीवनात मनोरंजन आणि रोमान्सचा ताळमेळ उत्तम राहील... सेलिब्रेशनचा हाच उत्तम काळ ठरेल.  
 
वर्षाच्या दुसऱ्या अर्ध्या भागात गुंतवणूक तसंच नवीन व्हेंचरसाठी प्रयत्न करताना सावधानता बाळगा. खर्च वाढल्यानं ताण-तणावाला सामोरं जावं लागू शकतं. 

योजनापूर्ण रित्या कठिण परिश्रम करून पुढे जाण्याचे प्रयत्न करा तुम्हाला नक्कीच यश मिळेल. तुम्हाला शांत राहण्याची गरज आहे. छोट्या छोट्या गोष्टींचा त्रास करून घेऊ नका. मोठी अप्रिय घटना घडणार नाही. परंतु, धैर्य आणि संयमाची गरजा आहे.