दक्षिण भारतीय सिनेसृष्टीतील एक अनमोल कलाकार असलेला कमल हासन हा भारतीय सिनेमाला आपल्या दर सिनेमागणिक १० पावलं पुढे नेत असतो. त्याने दिलेले एकहून एक हटके आणि अभिनयाची उंची गाठणारे परफॉर्मंसेस पाहून भलेभले अवाक होतात. कुठल्याही एक साच्यात अडकून न पडता कमल हासनने आत्तापर्यंत अभिनयात जी विविधता जोपासली आहे, तिला आंतरराष्ट्रीय स्तरावरही गौरवलं गेलं आहे. वैविध्यपूर्ण, काळाच्या पुढचे, तांत्रिकदृष्ट्या अद्भूत आणि आपल्या चेहऱ्यावर आणि अभिनयात प्रयोग करणारा हा अभिनयसम्राट कमल हासन... |