१९८९ साली आलेल्या अप्पू राजा सिनेमात कमल हासनने तीन भूमिका केल्या होत्या. वडील आणि दोन जुळी मुलं... लहानपणी हारवून मोठेपणी एकत्र आलेल्या आणि वडलांच्या खुनाचा बदला घेतलेल्या अँग्री यंग मॅनच्या सर्वसाधारण कथेत कमल हासनच्या अभिनयाने वैशिष्ट्यपूर्ण अंग दाखवून दिलं. यातील अप्पूच्या भूमिकेतला कमल हासन ३ फूट उंचीचा असतो. सर्कशीत विदुषक असणारा अप्पू विलक्षण पद्धतीने आपल्या वडलांच्या खुनाचा बदला घेतो. हा सिनेमा पाहाताना कमल हासनच्या अभिनयाला जेवढी दाद देऊ तेवढी थोडी वाटते. |