आमिरचे रंग-ढंग...

Mar 14, 2013, 08:39 AM IST

‘देल्ली बेली’

या सिनेमात आमिरनं कोणतीही भूमिका निभावली नव्हती. या सिनेमात आमिरनं फक्त ‘एक आयटम नंबर’ सादर केलं. ‘आय हेट यू लाईक आय लाईक यू’ हे गाणंही चांगलंच गाजलं. ८० च्या दशकाला सलाम करताना त्यानं या काळातील हिरोंची स्टाईल आणि कपडे वापरले होते. या गाण्याच्या ओळी आठवतानाच तुमच्या डोक्यात पटकन येईल तो रंगबेरंगी चकाकणारे कपडे, डार्क आणि मोठ्या काचांचा चष्म्यामध्ये दिसणारा आमिर...

1/13

‘३ इडियट’

आमिरच्या गाजलेल्या सिनेमांमधला हा तरुणांना अतिशय भावलेला सिनेमा. या सिनेमात तो पुन्हा एकदा कॉलेजच्या दिवसांत पोहचला होता पण याही वेळेस त्याचं वय त्याला अडवू शकलं नाही. या सिनेमाच्या शूटींगच्या वेळी आमिरनं ४४ व्या वर्षात पदार्पण केलं होतं आणि तो त्याच्या वयाच्या निम्या वयाच्या तरुणाची भूमिका निभावत होतं.

2/13

मंगल पांडे – द रायझिंग

या सिनेमात भारताच्या स्वातंत्र्यासाठी झगडणाऱ्या ‘मंगल पांडे’ या क्रांतीकारकाच्या भूमिकेत आमिर दिसला. त्याच्या या सिनेमातील लूकसाठी आमीरनं प्रचंड मेहनत घेतली होती. मोठे कुरळे केस, कमावलेलं दमदार-पिळदार शरीर आणि यूनिफॉर्ममधला मंगल पांडे प्रेक्षकांना स्वातंत्र्यपूर्व काळात घेऊन जाण्यात यशस्वी ठरला.

3/13

‘दिल चाहता है’

‘दिल चाहता है, कभी न बिते चमकिले दिन... हम ना रहें कभी यारों के बिन’ म्हणणारा आमीर आणि त्याचे मित्र कॉलेजगोईंग तरुणांसाठी आयकॉन ठरले होतं. हनुवटीवर छोटीशी दाढी आणि कूल लूकमधला ‘हॅपी गो लकी - सॅम’च्या भूमिकेतील आमीर खरं तर त्याच्या वयापेक्षा लहान भूमिकेत दिसला होता. मात्र,
त्याला सॅमच्या भूमिकेत पाहताना प्रेक्षकांना मात्र तो जरासाही खटकला नाही.

4/13

‘अर्थ १९४७’

‘अर्थ १९४७’ या सिनेमातील आमिरचा लूक थोडा हटकेच होता. एका मुस्लिम तरुणाच्या भूमिकेतील आमिरनं डोळ्यात ‘सुरमा’ घालून प्रेक्षकांना चांगलंच आकर्षित केलं होतं.

5/13

‘रंगीला’

रंगीला सिनेमात एका टपोरी मुलाच्या भूमिकेत दिसलेल्या आमीरची ही भूमिका त्याच्या इतर भूमिकांपेक्षा वेगळी ठरली. या सिनेमात जॅकी श्रॉफसारखा हिरो असूनदेखील आमिरनं आपली छाप या सिनेमावर उमटवली. सिनेमातील ‘रफ अॅन्ड टफ’ लूक तरुणांना चांगलाच भावला होता.

6/13

‘कयामत से कयामत तक’

‘कयामत से कयामत तक’ हा आमिरचा पहिलाच सिनेमा. या सिनेमात एखाद्या कॉलेजकुमाराप्रमाणे दिसणारा आमीर भलताच क्यूट दिसत होता. या सिनेमामतील ‘पापा कहते हैं बडा नाम करेगा’ हे गाणं आजही युवकांच्या तोंडपाठ आहे. ते या गाण्याशी आजही तितकंच ‘रिलेट’ करतात.

7/13

‘पी. के’

सध्या ‘पी. के’ या आमिरच्या आगामी सिनेमाची चर्चा रंगतेय. खरं म्हणजे, या सिनेमातील बऱ्याचशा गोष्टी अजूनही पडद्याआड आहेत. एक सस्पेन्स तयार करण्याचं काम दिग्दर्शक काळजीपूर्वक करत आहेत. पण, आमिर आहे म्हटल्यावर हा सस्पेन्स कायम राहण्याची चिन्हं कमीच... कारण, अनेकांचं त्याच्याकडे लक्ष असतंच. नुकताच त्याला ‘घागरा-चोरी’ अवतारात पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या. नंतर, हा त्याचा ‘पी. के’ मधला लूक असल्याचं उघड झालं.

चला आमिरचा आणखी एक प्रयोग आपल्याला लवकरच पाहायला मिळणार आहे... तूर्तास आमिरला हॅपी बर्थडे म्हणूयात आणि शुभेच्छा देऊयात...

8/13

‘तलाश : द आन्सर लाइज् विदीन’

‘तलाश : द आन्सर लाइज् विदीन’ या सिनेमात एका पोलिसाच्या भूमिकेत दिसलेल्या आमिरनं जाडसर ‘मूँछ’ ठेवली होती. आपल्या कर्तव्यात गंभीर असलेल्या पोलिसाच्या गंभीर भूमिकेतील आमिरनं ही भूमिका जिवंत केली.

9/13

‘फना’

‘फना’ या सिनेमात थोडा वेगळा दिसलेल्या आमिरनं खांद्यापर्यंत लांब आणि कुरळे केस मोठ्या खुबीनं सांभाळले होते.

10/13

`गझनी`

आपल्या प्रेयसीच्या खुनाचा बदला घेणाऱ्या ‘शॉर्ट टर्म मेमरी लॉस’चा आजार जडलेल्या तरुणाची भूमिका आमिरनं निभावली. या सिनेमात आमीर पहिल्यांदाच सिक्स पॅक अॅब्समध्ये दिसला. पण, हा लूक कमावण्यासाठीही त्यानं जबरदस्त मेहनत घेतली होती. त्याच्या बॉडीबरोबरच त्याची हेअरस्टाईलही तितकीच लोकप्रिय ठरली. त्याची ‘निअर बाल्ड क्रू कट’चा प्रयोग प्रेक्षकांनीही स्वत:वर करून पाहिला.

11/13

‘रंग दे बसंती’

बेफिकीर कॉलेजतरुणाच्या लूकमध्ये आमिर पुन्हा एकदा दिसला. काही काळासाठी तरुणांमध्ये त्याच्या या लूकची चर्चा जोरदार रंगली होती. अनेक तरुणी पुन्हा त्याच्याकडे आकर्षित झाल्या होत्या.

12/13

नाविन्याची ओढ...

बॉलिवूडचा ‘परफेक्शनिस्ट’ आमिर... जे द्यायचं ते परफेक्टचं असलं पाहिजे हा अट्टहास धरणारा आमिर १४ मार्चला आपल्या आयुष्यातील आणखी एक वर्ष पूर्ण करतोय. ४८ वर्षांच्या आमिरला पाहिलंत तर त्याच्या नेमक्या वयाबद्दल तुम्हीही संभ्रमात पडाल. आजवर त्यानं निभावत असलेल्या प्रत्येक भूमिकेत त्यानं आपल्या लूकवर भरपूर मेहनत घेतलीय. त्यामुळे तो आजही तरुणांचा फॅशन आयकॉन ठरतो... मग, रंगीलामधला टपोरी लूक असो किंवा ती गजनी सिनेमातील हेअरस्टाईल / सिक्स पॅक्स....

नाविन्य... हा मूळ स्वभावच आमिरमध्ये ठासून भरलाय. त्याच्या प्रत्येक सिनेमात त्यानं काहीतरी नाविन्यपूर्ण देण्याचा, स्वत: अनुभव घेण्याचा प्रयत्न केलाय. हे नाविन्य अगदी त्याच्या प्रत्येक सिनेमातील वेगवेगळ्या लूकमध्येही दिसून आलं...

चला तर एक नजर टाकुयात... आमिरच्या आजवरच्या वेगवेगळ्या लूक्सवर...

13/13