इराकमध्ये भीषण नरसंहार!

Jun 19, 2014, 10:09 AM IST
1/9

अमेरिका, ‘आयएसआयएस’ आणि इराकसद्दाम हुसेनची सत्ता उलथवून टाकणाऱ्या अमेरिकेनं आत्ताही हस्तक्षेप करत आपल्या ड्रोन विमानांचा वापर करून ‘आयएसआयएस’चा खात्मा करावा, अशी इराकची इच्छा आहे. इराकच्या भूमीवर उतरून थेट युद्ध करण्याची शक्यता अमेरिकेने फेटाळून लावली आहे. पण, सध्या ‘यूएसएस एच. डब्लू जॉर्ज बुश’ ही महाकाय विमानवाहू युद्धनौका अमेरिकेनं पर्शियन आखातात आणलीय. तिच्या जोडीला दोन क्षेपणास्त्रसज्ज युद्धनौकाही तैनात आहेत. .

अमेरिका, ‘आयएसआयएस’ आणि इराक


सद्दाम हुसेनची सत्ता उलथवून टाकणाऱ्या अमेरिकेनं आत्ताही हस्तक्षेप करत आपल्या ड्रोन विमानांचा वापर करून ‘आयएसआयएस’चा खात्मा करावा, अशी इराकची इच्छा आहे.

इराकच्या भूमीवर उतरून थेट युद्ध करण्याची शक्यता अमेरिकेने फेटाळून लावली आहे. पण, सध्या ‘यूएसएस एच. डब्लू जॉर्ज बुश’ ही महाकाय विमानवाहू युद्धनौका अमेरिकेनं पर्शियन आखातात आणलीय. तिच्या जोडीला दोन क्षेपणास्त्रसज्ज युद्धनौकाही तैनात आहेत.




.

2/9

कुर्द सुन्नींची महत्त्वाची भूमिका…इराकमधील कुर्द समुहाचे बहुतांश लोक सुन्नी पंथाचे आहेत. परंतु, तसं पाहिलं तर ते इराकी अरबांपेक्षा वेगळे आहेत. तेलाचा साठा अधिक असणाऱ्या उत्तर-पूर्व इराकचा प्रांत कुर्द समुहाकडे आहे. इथं त्यांचंच सरकार आहेत. कुर्दिश सिक्युरिटी फोर्स अंशिक स्वरुपात सरकारशी जोडली गेलेली आहे. ‘आयएसआयएस’शी दोन हात करण्यासाठी कुर्द महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. पण, कुर्दिश दहशतवाद्यांचं मात्र इराक सरकारशी वाकडं आहे. या कुर्दिश दहशतवाद्यांकडे आधुनिक हत्यारही उपलब्ध आहेत. तसंच ते प्रशिक्षितही आहेत. सध्या ‘आयएसआयएस’शीही ते दोन हात करत आहेत. पण, ‘आयएसआयएस’ आणि इराक सरकारमधल्या युद्धाचा फायदा घेत कुर्दिश दहशतवाद्यांनी किरकूक प्रांतातील तेल भांडारांवर ताबा मिळवलाय. त्यामुळे, इराक सरकारच्या डोक्यावर याचाही ताण आहेच. .

कुर्द सुन्नींची महत्त्वाची भूमिका…

इराकमधील कुर्द समुहाचे बहुतांश लोक सुन्नी पंथाचे आहेत. परंतु, तसं पाहिलं तर ते इराकी अरबांपेक्षा वेगळे आहेत. तेलाचा साठा अधिक असणाऱ्या उत्तर-पूर्व इराकचा प्रांत कुर्द समुहाकडे आहे. इथं त्यांचंच सरकार आहेत. कुर्दिश सिक्युरिटी फोर्स अंशिक स्वरुपात सरकारशी जोडली गेलेली आहे.

‘आयएसआयएस’शी दोन हात करण्यासाठी कुर्द महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. पण, कुर्दिश दहशतवाद्यांचं मात्र इराक सरकारशी वाकडं आहे. या कुर्दिश दहशतवाद्यांकडे आधुनिक हत्यारही उपलब्ध आहेत. तसंच ते प्रशिक्षितही आहेत. सध्या ‘आयएसआयएस’शीही ते दोन हात करत आहेत.

पण, ‘आयएसआयएस’ आणि इराक सरकारमधल्या युद्धाचा फायदा घेत कुर्दिश दहशतवाद्यांनी किरकूक प्रांतातील तेल भांडारांवर ताबा मिळवलाय. त्यामुळे, इराक सरकारच्या डोक्यावर याचाही ताण आहेच.




.

3/9

‘आयएसआयएस’ला कुठून मिळतं बळ?सीरियामध्ये लढणाऱ्या इतर इस्लामी दहशतवादी समुहांप्रमाणेच ‘आयएसआयएस’ही परदेशी मदतीवर अवलंबून नाही. सीरियामध्ये अधिकांश क्षेत्रावर ‘आयएसआयएस’चं नियंत्रण आहे. इथल्या स्थानिक लोकांकडून जबरदस्तीनं टॅक्स वसूल करण्यापर्यंत त्यांची मजल जाते. सीरिया सरकारलाच वीज विकून दहशतवादी कारवायांसाठी पैसा उभारणं ही यांची खेळी सर्वज्ञात आहे. आता या दहशतवादी संघटनेची नजर तेल आणि ऊर्जा संसाधनांवर आहे.  अलीकडेच मिळालेल्या माहितीनुसार, या संघटनेकडे तब्बल २.३ अब्ज डॉलर (सुमारे १४ हजार कोटी रुपये) इतकी संपत्ती असल्याचे उघड झालंय.  .

‘आयएसआयएस’ला कुठून मिळतं बळ?

सीरियामध्ये लढणाऱ्या इतर इस्लामी दहशतवादी समुहांप्रमाणेच ‘आयएसआयएस’ही परदेशी मदतीवर अवलंबून नाही. सीरियामध्ये अधिकांश क्षेत्रावर ‘आयएसआयएस’चं नियंत्रण आहे. इथल्या स्थानिक लोकांकडून जबरदस्तीनं टॅक्स वसूल करण्यापर्यंत त्यांची मजल जाते. सीरिया सरकारलाच वीज विकून दहशतवादी कारवायांसाठी पैसा उभारणं ही यांची खेळी सर्वज्ञात आहे. आता या दहशतवादी संघटनेची नजर तेल आणि ऊर्जा संसाधनांवर आहे.

अलीकडेच मिळालेल्या माहितीनुसार, या संघटनेकडे तब्बल २.३ अब्ज डॉलर (सुमारे १४ हजार कोटी रुपये) इतकी संपत्ती असल्याचे उघड झालंय.




.

4/9

सीरिया संकट आणि आयएसआयएसइराकवर ‘आयएसआयएस’च्या पाठिमागे सीरिया संकटांची मालिकाही कारणीभूत आहे. सीरियातील यादवी युद्धामुळे ‘आयएसआयएस’ला नियंत्रित क्षेत्रांवर ताबा मिळवण्याची पूरेपूर संधी उपलब्ध झाली. ज्या भागांवर ‘आयएसआयएस’नं ताबा मिळवलाय त्या भागांत पैसे आणि हत्यारांची कोणतीही कमी नाही. तसंच या संघटनेला स्थानीय बाजार, तेल आणि गॅस क्षेत्रातूनही भारीभक्कम रक्कम मिळते.  सीरिया ‘आयएसआयएस’साठी सर्वात सुरक्षित ठिकाण मानलं जातं. कठिण प्रसंगी या संघटनेचे दहशतवादी सीरियाचा आसरा घेतात... आणि कधी सीरियातून पळण्याची वेळ आली तर हे लोक इराकमध्ये येऊन लपतात. पूर्व सीरियामध्ये ‘आयएसआयएस’चा दबदबा दिसून येतो..

सीरिया संकट आणि आयएसआयएस

इराकवर ‘आयएसआयएस’च्या पाठिमागे सीरिया संकटांची मालिकाही कारणीभूत आहे. सीरियातील यादवी युद्धामुळे ‘आयएसआयएस’ला नियंत्रित क्षेत्रांवर ताबा मिळवण्याची पूरेपूर संधी उपलब्ध झाली. ज्या भागांवर ‘आयएसआयएस’नं ताबा मिळवलाय त्या भागांत पैसे आणि हत्यारांची कोणतीही कमी नाही. तसंच या संघटनेला स्थानीय बाजार, तेल आणि गॅस क्षेत्रातूनही भारीभक्कम रक्कम मिळते.

सीरिया ‘आयएसआयएस’साठी सर्वात सुरक्षित ठिकाण मानलं जातं. कठिण प्रसंगी या संघटनेचे दहशतवादी सीरियाचा आसरा घेतात... आणि कधी सीरियातून पळण्याची वेळ आली तर हे लोक इराकमध्ये येऊन लपतात. पूर्व सीरियामध्ये ‘आयएसआयएस’चा दबदबा दिसून येतो.




.

5/9

ईरानमुळे संकटांत वाढ...ईरानमध्येही शिया सरकार आहे. इराकसोबत ईरानचे घनिष्ठ संबंध आहेत. काही दिवसांपूर्वी ज्याप्रमाणे सीरियामध्ये शिया सरकारला पाडून सुन्नी सरकार अस्तित्वात आलं, तोच प्रकार ईरानमध्येही व्हावा हे ईरान सरकारला मान्य नाही.त्याचमुळे इराकमध्ये आयएसआयएसशी दोन हात करण्यासाठी ईराननं आपल्या दोन विशेष बटालियन इराकच्या मदतीला धाडल्यात. पण, याचमुळेही आयएसआयएसला सुन्नी जनसमुहाचा मोठा पाठिंबा मिळतोय. तसंच, आपल्या देशात परकियांनी येऊन हस्तक्षेप करावा हे अनेक इराक नागरिकांना मान्य नाही. त्यामुळे, ते अमेरिका आणि ईरानच्या हस्तक्षेपामुळे नाराज आहेत.  .

ईरानमुळे संकटांत वाढ...

ईरानमध्येही शिया सरकार आहे. इराकसोबत ईरानचे घनिष्ठ संबंध आहेत. काही दिवसांपूर्वी ज्याप्रमाणे सीरियामध्ये शिया सरकारला पाडून सुन्नी सरकार अस्तित्वात आलं, तोच प्रकार ईरानमध्येही व्हावा हे ईरान सरकारला मान्य नाही.

त्याचमुळे इराकमध्ये आयएसआयएसशी दोन हात करण्यासाठी ईराननं आपल्या दोन विशेष बटालियन इराकच्या मदतीला धाडल्यात.

पण, याचमुळेही आयएसआयएसला सुन्नी जनसमुहाचा मोठा पाठिंबा मिळतोय. तसंच, आपल्या देशात परकियांनी येऊन हस्तक्षेप करावा हे अनेक इराक नागरिकांना मान्य नाही. त्यामुळे, ते अमेरिका आणि ईरानच्या हस्तक्षेपामुळे नाराज आहेत.




.

6/9

इराकी सैन्य आणि आयएसआयएसमग, या सगळ्या युद्धात सैन्य काय भूमिका बजावतंय... असा साहजिकच प्रश्न तुम्हाला पडला असेल... पण, जशी दुफळी शिया-सुन्नी नागरिकांत पडलीय तीच दुफळी इथं शिया-सुन्नी सैनिकांमध्येही पडलेली दिसतेय. इराक सेनेमध्ये शिया आणि सुन्नी दोन्ही समुदायाचे सैनिक आहेत. पण, इराकचे पंतप्रधान नुरी अल मलिकी यांच्या सरकारसाठी लढण्यासाठी आणि आपले प्राण देण्यासाठी ते तयार नाहीत. आयएसआयएसची इराक सरकारला आव्हान देण्याची हिम्मतही झाली नसती... कारण, तसं पाहिलं तर इराकच्या महाकाय सेनेपुढे ‘आयएसआयएस’च्या दहशतवाद्यांची संख्या काहीच नाही... आकड्यांच्याच भाषेत सांगायचं तर आयएसआयएसचं संख्याबळ जवळपास 7000 आहे तर इराककडे यापेक्षा 35 पटीनं जास्त म्हणजेच 2,50,000 सैनिकांची फौज आहेच शिवाय वेगळं सशस्त्र पोलीस दलही आहे. तसंच इराक सेनेकडे टँक, विमानदल आणि हॅलिकॉप्टर्सही आहेत. त्याचमुळे राजधानी बगदादवर ताबा मिळवणं आयएसआयएससाठी अशक्यप्राय गोष्ट आहे. पण, इराकसेनेत पडलेली फूट ही शक्यता निर्माण करतेय. .

इराकी सैन्य आणि आयएसआयएस

मग, या सगळ्या युद्धात सैन्य काय भूमिका बजावतंय... असा साहजिकच प्रश्न तुम्हाला पडला असेल... पण, जशी दुफळी शिया-सुन्नी नागरिकांत पडलीय तीच दुफळी इथं शिया-सुन्नी सैनिकांमध्येही पडलेली दिसतेय. इराक सेनेमध्ये शिया आणि सुन्नी दोन्ही समुदायाचे सैनिक आहेत. पण, इराकचे पंतप्रधान नुरी अल मलिकी यांच्या सरकारसाठी लढण्यासाठी आणि आपले प्राण देण्यासाठी ते तयार नाहीत.

आयएसआयएसची इराक सरकारला आव्हान देण्याची हिम्मतही झाली नसती... कारण, तसं पाहिलं तर इराकच्या महाकाय सेनेपुढे ‘आयएसआयएस’च्या दहशतवाद्यांची संख्या काहीच नाही... आकड्यांच्याच भाषेत सांगायचं तर आयएसआयएसचं संख्याबळ जवळपास 7000 आहे तर इराककडे यापेक्षा 35 पटीनं जास्त म्हणजेच 2,50,000 सैनिकांची फौज आहेच शिवाय वेगळं सशस्त्र पोलीस दलही आहे. तसंच इराक सेनेकडे टँक, विमानदल आणि हॅलिकॉप्टर्सही आहेत.

त्याचमुळे राजधानी बगदादवर ताबा मिळवणं आयएसआयएससाठी अशक्यप्राय गोष्ट आहे. पण, इराकसेनेत पडलेली फूट ही शक्यता निर्माण करतेय.




.

7/9

इराक सराकरची भूमिकाइराक हा बहुसंख्यांक शिया लोकसंख्या असलेला देश आहे. इराणचा माजी राज्यकर्ता सद्दाम हुसैन हा सुन्नी होता... पण, 2003 साली अमेरिकेनं सद्दाम हुसेनचा पाडाव केला. 30 डिसेंबर 2006 रोजी बगदादमध्ये सकाळी 6 वाजता सद्दाम हुसेनला फाशी देण्यात आली. पण, सद्दाम हुसेनचा पाडाव झाल्यानंतर तख्तपालट झालं आणि इथली सत्ता शिया समुदायाच्या हातात गेली. इराकचे सद्य पंतप्रधान नुरी अल मलिकी शिया पंथाचे आहेत.सुन्नी समुदायाच्य मते त्यांना शिया सरकारकडून योग्य प्रतिनिधित्व मिळालेलं नाही. त्याचमुळे ‘आयएसआयएस’ या दहशतवादी संघटनेला सुन्नी समुदायाकडूनही आणखी हवा मिळाली. त्याचमुळे उत्तर-पूर्व इराकमध्ये या संघटनेचं वर्चस्व कायम आहे. राजधानी बगदादच्या आजूबाजूची अनेक शहरे ताब्यात घेतल्यानंतर आता थेट राजधानीवरच ताबा मिळवण्याच्या दहशतवाद्यांच्या प्रयत्नांनी इराक सरकारचं अस्तित्वच धोक्यात आलंय. त्यांच्या जोरदार मुसंडीला तोंड देण्यासाठी इराकी सरकारची प्रयत्नांची शर्थ सुरू असून, अगदी सर्वसामान्य नागरिकांनाही या दहशतवादी संघटनेला तोंड देण्यासाठी सज्ज केले जातंय. .

इराक सराकरची भूमिका


इराक हा बहुसंख्यांक शिया लोकसंख्या असलेला देश आहे. इराणचा माजी राज्यकर्ता सद्दाम हुसैन हा सुन्नी होता... पण, 2003 साली अमेरिकेनं सद्दाम हुसेनचा पाडाव केला. 30 डिसेंबर 2006 रोजी बगदादमध्ये सकाळी 6 वाजता सद्दाम हुसेनला फाशी देण्यात आली. पण, सद्दाम हुसेनचा पाडाव झाल्यानंतर तख्तपालट झालं आणि इथली सत्ता शिया समुदायाच्या हातात गेली. इराकचे सद्य पंतप्रधान नुरी अल मलिकी शिया पंथाचे आहेत.

सुन्नी समुदायाच्य मते त्यांना शिया सरकारकडून योग्य प्रतिनिधित्व मिळालेलं नाही. त्याचमुळे ‘आयएसआयएस’ या दहशतवादी संघटनेला सुन्नी समुदायाकडूनही आणखी हवा मिळाली. त्याचमुळे उत्तर-पूर्व इराकमध्ये या संघटनेचं वर्चस्व कायम आहे.

राजधानी बगदादच्या आजूबाजूची अनेक शहरे ताब्यात घेतल्यानंतर आता थेट राजधानीवरच ताबा मिळवण्याच्या दहशतवाद्यांच्या प्रयत्नांनी इराक सरकारचं अस्तित्वच धोक्यात आलंय. त्यांच्या जोरदार मुसंडीला तोंड देण्यासाठी इराकी सरकारची प्रयत्नांची शर्थ सुरू असून, अगदी सर्वसामान्य नागरिकांनाही या दहशतवादी संघटनेला तोंड देण्यासाठी सज्ज केले जातंय.




.

8/9

दहशतवादी संघटना - आयएसआयएस‘इस्लामिक स्टेट इन इराक अॅन्ड लेव्हान्त’ म्हणजेच आयएसआयएसनं सध्या इराकच्या अनेक शहरांवर ताबा मिळवलाय. आता या संघटनेची नजर आहे ती इराकची राजधानी बगदादवर... सध्या इराकमध्ये मृतांचे ढीग जमा झालेले दिसत आहेत... 2004 साली अस्तित्वात आलेल्या या आयएसआयएस किंवा इसिस या समूहाचा एकमेव उद्देश म्हणजे इराक आणि सीरिया यो दोन्ही देशांना सुन्नी इस्लामिक राष्ट्र बनवणं हेच होय. ही संघटना म्हणजे ‘अल-कायदा’ या दहशतवादी संघटनेचाच एक भाग आहे. आयएसआयएस हा काही धर्मांध ‘सुन्नी’ जनसमूहाचा दहशतवादी गट आहे. इराकमध्ये सुन्नी गटाची सत्ता प्रस्थापित करण्यासाठी या संघटनेचे हे प्रयत्न सुरु आहेत. या संघर्षाला तशी खूप मोठी पार्श्वभूमीही कारणीभूत आहे. इराणचं राजकारणही धार्मिक मुद्द्यांवर आधारलेलं आहेत.  .

दहशतवादी संघटना - आयएसआयएस

‘इस्लामिक स्टेट इन इराक अॅन्ड लेव्हान्त’ म्हणजेच आयएसआयएसनं सध्या इराकच्या अनेक शहरांवर ताबा मिळवलाय. आता या संघटनेची नजर आहे ती इराकची राजधानी बगदादवर... सध्या इराकमध्ये मृतांचे ढीग जमा झालेले दिसत आहेत...

2004 साली अस्तित्वात आलेल्या या आयएसआयएस किंवा इसिस या समूहाचा एकमेव उद्देश म्हणजे इराक आणि सीरिया यो दोन्ही देशांना सुन्नी इस्लामिक राष्ट्र बनवणं हेच होय. ही संघटना म्हणजे ‘अल-कायदा’ या दहशतवादी संघटनेचाच एक भाग आहे.

आयएसआयएस हा काही धर्मांध ‘सुन्नी’ जनसमूहाचा दहशतवादी गट आहे. इराकमध्ये सुन्नी गटाची सत्ता प्रस्थापित करण्यासाठी या संघटनेचे हे प्रयत्न सुरु आहेत. या संघर्षाला तशी खूप मोठी पार्श्वभूमीही कारणीभूत आहे. इराणचं राजकारणही धार्मिक मुद्द्यांवर आधारलेलं आहेत.




.

9/9

शिया-सुन्नी... यादवी युद्धइराकमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात यादवी युद्ध सुरु आहे. देशातील नागरिकांना दहशतवाद्यांसोबतच धर्मांधतेच्या आहारी गेलेल्या सैतांनांकडून धोका निर्माण झालाय. हिंसेचं एक मोठं सत्रच या देशात सुरु आहे... ते कधी थांबणार हे सांगता येणं अशक्य आहे... ठिकठिकाणी मृतदेहांचे ढीग पडलेले आहेत... नुकतंच, शिया सैनिकांना उघडउघडपणे गोळ्या घालतानाचे फोटो ‘आयएसआयएस’ या दहशतवादी संघटनेने प्रसिद्ध केले... ते फोटो खरं असल्याचंही इरान सरकारनं स्पष्ट केलंय... पण, इराकमध्ये हा सगळा नेमका काय प्रकार सुरु आहे... ‘आयएसआयएस’ ही नेमकी काय भानगड आहे... त्याचा इराक आणि शेजारील देशांवर मुख्यत: काय परिणाम होऊ शकतो... यावर एक नजर टाकुयात.....

शिया-सुन्नी... यादवी युद्ध


इराकमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात यादवी युद्ध सुरु आहे. देशातील नागरिकांना दहशतवाद्यांसोबतच धर्मांधतेच्या आहारी गेलेल्या सैतांनांकडून धोका निर्माण झालाय. हिंसेचं एक मोठं सत्रच या देशात सुरु आहे... ते कधी थांबणार हे सांगता येणं अशक्य आहे... ठिकठिकाणी मृतदेहांचे ढीग पडलेले आहेत... नुकतंच, शिया सैनिकांना उघडउघडपणे गोळ्या घालतानाचे फोटो ‘आयएसआयएस’ या दहशतवादी संघटनेने प्रसिद्ध केले... ते फोटो खरं असल्याचंही इरान सरकारनं स्पष्ट केलंय...

पण, इराकमध्ये हा सगळा नेमका काय प्रकार सुरु आहे... ‘आयएसआयएस’ ही नेमकी काय भानगड आहे... त्याचा इराक आणि शेजारील देशांवर मुख्यत: काय परिणाम होऊ शकतो... यावर एक नजर टाकुयात....




.