दहशतवादी अजमल कसाब याला फाशी देण्यात आल्याने सर्वत्र संदेश गेला आहे की, या देशात कायद्याचे राज्य आहे, अशी प्रतिक्रिया देताना कसाबचे येरवड्यामध्येच मुस्लिम रितीरिवाजानुसार दफन करण्यात आल्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले. कसाबला आज सकाळी फाशी देण्यात आली. त्यानंतर त्याला येरवड्यामध्येच मुस्लिम रितीरिवाजानुसार दफन करण्यात आले. भारतात कायद्याचे राज्य मजबूत आहे, हे यामुळे स्पष्ट झाले आहे, चव्हाण म्हणालेत. कायद्याच्या प्रक्रियेत कोणालाही वेगळा न्याय देण्यात येत नसून, प्रत्येकाला समान न्याय मिळतो, हेही यामुळे जाहीर झाले. कायद्याचा योग्य पालन केल्याचे हे उदाहरण आहे. सुरक्षेसाठी ही गुप्तता पाळण्यात आली होती, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
|