जगातील काही समाजाचे विचित्र अंत्यविधी प्रकार

May 20, 2014, 16:42 PM IST
1/7

जपान आणि रशियात अस्वलाची विचित्र पूजाजपान आणि रशियाच्या काही भागात राहणाऱ्या ऐनू आदिवासींच्या जमातीत अस्वलाची पूजा करण्याची परंपरा आहे. पण ही पूजा मात्र विचित्र असते. ही लोकं अस्वलाचा बळी देतात आणि त्याची पूजा करतात. यांच्या परंपराच्या मान्यतेनुसार, अस्वल हा ईश्वराचा अवतार असतो. अस्वलाने मानवी समाजात जन्म घेतला आहे. याचा बळी दिल्याने मानवी समाजातील आत्म्याला शांती मिळेत. ही लोकं अस्वलाला मारून त्याचं रक्त पितात आणि त्याचं मांस खातात. यानंतर त्याचं डोकं आणि त्याची त्वचा एकत्र ठेऊन त्याची पूजा केली जाते. ही पूजा देशातील काही भागातच होते.

जपान आणि रशियात अस्वलाची विचित्र पूजा
जपान आणि रशियाच्या काही भागात राहणाऱ्या ऐनू आदिवासींच्या जमातीत अस्वलाची पूजा करण्याची परंपरा आहे. पण ही पूजा मात्र विचित्र असते. ही लोकं अस्वलाचा बळी देतात आणि त्याची पूजा करतात. यांच्या परंपराच्या मान्यतेनुसार, अस्वल हा ईश्वराचा अवतार असतो. अस्वलाने मानवी समाजात जन्म घेतला आहे. याचा बळी दिल्याने मानवी समाजातील आत्म्याला शांती मिळेत. ही लोकं अस्वलाला मारून त्याचं रक्त पितात आणि त्याचं मांस खातात. यानंतर त्याचं डोकं आणि त्याची त्वचा एकत्र ठेऊन त्याची पूजा केली जाते. ही पूजा देशातील काही भागातच होते.

2/7

एस्किमो लोकांची अंत्यविधीची पद्धतएस्किमो लोकांमध्ये जेव्हा एखादी व्यक्ती मृत्यू पावते. तेव्हा त्या व्यक्तीच्या शरीराला बर्फाच्या लादीवर ठेऊन नंतर ते शरीर सोडून दिले जाते. एस्किमो लोकांचा पुनर्जन्मावर खूपच विश्वास आहे. या कारणाने एस्किमो लोकं आपल्या घरातील मृत व्यक्तींना सन्मानाने निरोप देतात.

एस्किमो लोकांची अंत्यविधीची पद्धत
एस्किमो लोकांमध्ये जेव्हा एखादी व्यक्ती मृत्यू पावते. तेव्हा त्या व्यक्तीच्या शरीराला बर्फाच्या लादीवर ठेऊन नंतर ते शरीर सोडून दिले जाते. एस्किमो लोकांचा पुनर्जन्मावर खूपच विश्वास आहे. या कारणाने एस्किमो लोकं आपल्या घरातील मृत व्यक्तींना सन्मानाने निरोप देतात.

3/7

इंडोनेशियात मृत शरीरासोबत राहण्याची परंपराइंडोनेशियाच्या तोराज जिल्ह्यात राहणाऱ्या काही प्रचिन समाजात आज देखील एक विचित्र परंपरा चालूच आहे. या ठिकाणी मृत शरीरासोबत अनेक महिेने राहण्याची परंपरा प्राचिन काळापासून चालली आहे. मृत शरीराला दफन करण्याआधी एका विशिष्ट प्रकारचे लेप लावले जातात. नंतर मग एका खोलित त्याला ठेवले जाते आणि त्यासोबत काही महिने घरातील लोकांना राहावं लागतं.

इंडोनेशियात मृत शरीरासोबत राहण्याची परंपरा
इंडोनेशियाच्या तोराज जिल्ह्यात राहणाऱ्या काही प्रचिन समाजात आज देखील एक विचित्र परंपरा चालूच आहे. या ठिकाणी मृत शरीरासोबत अनेक महिेने राहण्याची परंपरा प्राचिन काळापासून चालली आहे. मृत शरीराला दफन करण्याआधी एका विशिष्ट प्रकारचे लेप लावले जातात. नंतर मग एका खोलित त्याला ठेवले जाते आणि त्यासोबत काही महिने घरातील लोकांना राहावं लागतं.

4/7

आपल्या पत्नीला उचलून जळत्या निखाऱ्यावरून चालण्याची परंपराचीनमध्ये लग्नानंतर पतीला आपल्या पत्नीला उचलून जळत्या निखाऱ्यावरून चालण्याची परंपरा आहे. हे केल्याने नवरा आपल्या पत्नीची आयुष्यभर चांगली काळजी घेऊ शकतो, हे लोकांना कळते. काही वेळेस दांपत्यावर कोणतेही नैसर्गिक आपत्ती येऊ नये, हा विचार देखील कोळशांवरून चालण्यामागे असतो. चीनची ही पारंपारीक पद्धत आहे. पण सगळ्याच चीनी बांधवांना हे करण्याची सक्ती मात्र नाही.

आपल्या पत्नीला उचलून जळत्या निखाऱ्यावरून चालण्याची परंपरा
चीनमध्ये लग्नानंतर पतीला आपल्या पत्नीला उचलून जळत्या निखाऱ्यावरून चालण्याची परंपरा आहे. हे केल्याने नवरा आपल्या पत्नीची आयुष्यभर चांगली काळजी घेऊ शकतो, हे लोकांना कळते. काही वेळेस दांपत्यावर कोणतेही नैसर्गिक आपत्ती येऊ नये, हा विचार देखील कोळशांवरून चालण्यामागे असतो. चीनची ही पारंपारीक पद्धत आहे. पण सगळ्याच चीनी बांधवांना हे करण्याची सक्ती मात्र नाही.

5/7

इंडोनेशियाच्या आदिवासींची बोट कापण्याची परंपराइंडोनेशियात राहणाऱ्या दानी आदिवासींच्या घरात जर कोणाचा मृत्यू झाला, तर त्या घरातील महिलेला फारच यातना भोगाव्या लागतात. यात तिला भावनात्मक आणि शारीरिक यातना देखील भोगणे गरजेचे असते. या इथे आदिवासींच्या घरात कोणाचा मृत्यू झाला असेल, तर त्या घरातील महिलेला आपले बोट कापावे लागते किंवा बोटाचा काहीसा तुकडा कापावा लागतो.यामागे आपल्या माणसांच्या आत्म्याला संतुष्ट करण्याची भावना आदिवासींची असते.

इंडोनेशियाच्या आदिवासींची बोट कापण्याची परंपरा
इंडोनेशियात राहणाऱ्या दानी आदिवासींच्या घरात जर कोणाचा मृत्यू झाला, तर त्या घरातील महिलेला फारच यातना भोगाव्या लागतात. यात तिला भावनात्मक आणि शारीरिक यातना देखील भोगणे गरजेचे असते. या इथे आदिवासींच्या घरात कोणाचा मृत्यू झाला असेल, तर त्या घरातील महिलेला आपले बोट कापावे लागते किंवा बोटाचा काहीसा तुकडा कापावा लागतो.
यामागे आपल्या माणसांच्या आत्म्याला संतुष्ट करण्याची भावना आदिवासींची असते.

6/7

अॅमेझॉन जंगलातील आदिवासींचे अंत्यविधीव्हेनेझूएला आणि ब्राझीलच्या मध्यात असलेले अॅमेझॉनचे जंगल हे जगातील मोठ्या जंगलांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. येथे राहणारी आदिवासी जमातीची अंत्यविधी ही फारच विचित्र आहे. ही लोकं घरातील कुठल्याही व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याचे शव हे पानांमध्ये गुंडाळून त्याला किड्यांना खाण्यासाठी सोडून देतात. यानंतर ३० ते ४५ दिवसांच्या कालावधीनंतर त्या शवाचे उरलेले अवशेष आणि हाडं हे केळ्याच्या सूपमध्ये टाकून खाऊन टाकतात.आदिवासींच्या मते असं केल्याने, मेलेल्या व्यक्तीला स्वर्ग प्राप्ती होते.

अॅमेझॉन जंगलातील आदिवासींचे अंत्यविधी
व्हेनेझूएला आणि ब्राझीलच्या मध्यात असलेले अॅमेझॉनचे जंगल हे जगातील मोठ्या जंगलांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. येथे राहणारी आदिवासी जमातीची अंत्यविधी ही फारच विचित्र आहे. ही लोकं घरातील कुठल्याही व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याचे शव हे पानांमध्ये गुंडाळून त्याला किड्यांना खाण्यासाठी सोडून देतात. यानंतर ३० ते ४५ दिवसांच्या कालावधीनंतर त्या शवाचे उरलेले अवशेष आणि हाडं हे केळ्याच्या सूपमध्ये टाकून खाऊन टाकतात.
आदिवासींच्या मते असं केल्याने, मेलेल्या व्यक्तीला स्वर्ग प्राप्ती होते.

7/7

विविध समाज आणि संस्कृतीजगातील विविध समाजाची एक विशिष्ट अशी स्वत:ची संस्कृती आहे. माणसाच्या आयुष्यात त्याच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंत जे काही संस्कार त्याच्यावर केले जातात. त्यामागे एका संस्कृतीचा विचार असतो.हे जरूरी नाही की सगळ्यांच्या परंपरा या समान आणि सारख्या असल्याचं पाहिजेत. जगात काही समुदयांच्या अशा देखील परंपरा आहेत, जे ऐकल्यावर तुम्हाला आश्चर्य होईल. पाहुया अशाच काही परंपरा..

विविध समाज आणि संस्कृती
जगातील विविध समाजाची एक विशिष्ट अशी स्वत:ची संस्कृती आहे. माणसाच्या आयुष्यात त्याच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंत जे काही संस्कार त्याच्यावर केले जातात. त्यामागे एका संस्कृतीचा विचार असतो.
हे जरूरी नाही की सगळ्यांच्या परंपरा या समान आणि सारख्या असल्याचं पाहिजेत. जगात काही समुदयांच्या अशा देखील परंपरा आहेत, जे ऐकल्यावर तुम्हाला आश्चर्य होईल.
पाहुया अशाच काही परंपरा..