टाटाची नवीन मॉडेल

Jun 16, 2013, 07:35 AM IST

टाटा इंडिगोध्येही काही बदल

टाटा मोटर्सने त्यांच्या टाटा इंडिगो ईसीएफमध्येही काही बदल करून ती पुन्हा सादर केली जात असल्याचे जाहीर केले आहे. ही गाडीही १९ जूनलाच सादर होत आहे. सेदान श्रेणीतील होंडा अमेझ, महिंद्रची व्हेरिटो विबे यांच्याशी इंडिगोला स्पर्धा करावी लागत असल्याने नवीन व्हर्जन सादर करण्यात अधिक वेळ घालविला जाणार नसल्याचेही कंपनी अधिकाऱ्यांनी सांगितले.
1/4

टाटा सुमो  नव्या अवतारात

नॅनोच्या नवीन मॉडेलबरोबरच टाटा सुमो ही नव्या अवतारात १९ जूनला सादर केली जात आहे. यात इंटिरियल बदल करण्यात आले आहेत. स्टिरिओ सिस्टिम, ब्ल्यू टूथ कनेक्टीव्हिटी अशी त्यांची अन्य वैशिष्ट्ये आहेत.
2/4

निळ्या रंगात

नव्या नॅनोमध्ये काही महत्त्वाचे बदलही केले जात आहेत, नवीन बंपर डिझाईन आणि नवीन निळा रंग या मॉडेलमध्ये उपलब्ध होणार आहेत. नॅनो २०१२ सादर केल्यानंतर नॅनोच्या विक्रीत वाढ झाल्याचे दिसून आले होते आणि नॅनो २०१३ आणि सीएनजी नॅनोबरोबरच सादर होत असून त्यामुळे मागील नुकसान भरून विक्रीचे प्रमाण वाढेल, असा विश्वास कंपनी अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
3/4

नॅनो आता नवीन रूपात

सर्वात स्वस्त कार म्हणून ओळख मिळविलेल्या टाटाच्या नॅनोचा खप चांगला वाढत नसल्याने नॅनोसाठी आता नवीन युक्ती कंपनीने शोधली आहे. कंपनीने नॅनो २०१३ बरोबरच सीएनजी इंजिनासह नवी नॅनो या वर्षात सादर करण्याचा निर्णय घेतलाय. पेट्रोल आणि डिझेलचे वाढते दर लक्षात घेऊन सीएनजी इंजिनसह नॅनो सादर केली जात आहे. त्यामुळे शहरी भागात तरी नॅनोची विक्री वाढेल, अशी कंपनीला अपेक्षा आहे.
4/4