टॉप १० `गरमागरम` सिनेमे

Sep 6, 2012, 06:27 PM IST

जिस्म-२

पूजा भट्टने आधीच ‘जिस्म’सारखा श्रृंगारपट देऊन अपेक्षा वाढवल्या होत्या. त्यातच सनी लिऑनसारख्या पॉर्न स्टारला घेऊन आणि सिनेमातील नग्नतेचीच जास्त जाहिरातबाजी करून हवा चांगलीच तापवली. पण एवढं असूनही सिनेमा अपेक्षाभंग करणाराच ठरला.
1/10

हेट स्टोरी

दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रीने बनवलेल्या या सिनेमात कथा, तर्क या गोष्टी सोडून श्रृंगार एके श्रृंगारच दाखवला गेला. बंगाली बॉम्बशेल पाओली दाम हिचे वेगवेगळ्या पुरूषांसोबतची वेगवेगळी बेडरुम दृश्यं श्रृंगारीक होती, यात शंकाच नाही. मात्र या सिनेमाला बाकी काहीच अर्थ नव्हता.
2/10

द डर्टी पिक्चर

विद्या बालनसारखी दमदार अभिनेत्री आणि तिचे उत्तान सीन्स, भारदार उरोज, लव्हमेकिंग सीन्स यामुळे सिनेमा कमालीचा गाजला. द्व्यर्थी संवादांची सोबत फोडणी होतीच. मुळातच कामुक सिनेमे करणाऱ्या बी ग्रेड अभिनेत्रीवरच आधारलेला सिनेमा असल्यामुळे यात अश्लीलतेला खूपच वाव होता. मात्र,  जरी यावर लोकांनी आक्षेप घेतला, तरी सिनेमा सुपर हिट ठरला आणि विद्याला या भूमिकेसाठी राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला.
3/10

द नेमसेक

झुंपा लाहिरी यांच्या द नेमसेक या कादंबरीवरील सिनेमात इर्फान खान आणि तब्बू यांच्यातील विवाह संपन्न होण्यासाठी केल्या गेलेल्या लव्हमेकिंग सीन्समुळे हा सिनेमा श्रृंगारीक बनला. सिनेमातील दुसरे कलावंत काल पेन आणि झुलेका रॉबिन्सन यांच्यातील वैशिष्ट्यपूर्ण लव्हमेकिंग सीन्समुळे हा सिनेमा आकर्षक बनला.
4/10

अनुभव

शेखर सुमन आणि पद्मिनी कोल्हापुरे यांच्यातील गरमा गरम दृश्यांपेक्षा विषयातील बोल्डनेस जास्त अश्लील वाटला. सेक्सबद्दल अनेक आशा बाळगलेला नवरा आणि सेक्सचं काडीचंही ज्ञान नसलेली बालीश, अल्लड पत्नी यांच्यातील कामुक संवाद, उत्तान हावभाव यांमुळे चित्रपट अश्लीलतेकडे झुकला. पद्मिनी कोल्हापुरेची कामुक दृश्यं विशेष गाजली. या सिनेमात राकेश रोशननेही काम केलं होतं.
5/10

माया मेमसाब

`मॅडम बोव्हरी` या कादंबरीवर आधारीत माया मेमसाब सिनेमातील बेडरूम सीन्स खूपच हॉट असल्याने श्रृंगारीक ठरले. विशेष म्हणजे या सिनेमात दीपा साहीबरोबर आजचा सुपरस्टार शाहरुख खानने दिलेल्या नग्न दृश्यांमुळे अनेकांची झोप उडाली. या सिनेमात प्रथमच शाहरुख खानने आपले नितंब उघडे दाखवून आणि दीपा साहीने संपूर्ण नग्न होऊन लव्हसीन्स दिल्यामुळे खळबळ माजलीय यानंतर शाहरूख रोमांसचा बादशाह म्हणून हिट झाला. पण त्यानंतर कधीही शाहरूखने असे बोल्ड दृश्य दिले नाही.
6/10

राम तेरी गंगा मैली

धबधब्याखाली शुभ्र पारदर्शक कपड्यांमध्ये अंघोळ करणारी मंदाकिनी कुणीच विसरू शकणार नाही. याशिवाय तिचा राजीव कपूरसोबत दाखवला गेलेला लांबलचक सेक्स सीनही या कथेच्या आशयाला मारक ठरला. भारतीय मूल्यं, संस्कृती दर्शन यांच्या नावाखाली पुन्हा नायिकेच्या पुष्ट स्तनांचं दर्शन घडवून राज कपूर यांनी वाद ओढावून घेतला.
7/10

सत्यम शिवम सुंदरम

झीनत अमानची तंग वस्त्रं, शशी कपूरसोबतची गरमा गरम चुंबनदृश्यं यांमुळे बऱ्याच जणांच्या भुवया उंचावल्या. परदेशात या सिनेमाला मान-सन्मान मिळूनही भारतीय प्रेक्षकांना यातील श्रृंगार झेपला नाही. विशेष म्हणजे राज कपूर यांचं दिग्दर्शन असल्यामुळे नायिकेच्या उरोजांचं प्रेक्षकांना चाळवणारं दर्शन वारंवार घडत होतं. बाह्यसौंदर्यापेक्षा मनाचं सौंदर्य महत्वाचं, असं सांगणारा हा सिनेमा प्रेक्षकांना मात्र अश्लील वाटला.

8/10

उत्सव

अनेक मोठमोठे अभिनेते असलेला श्रृंगारपट म्हणजे ‘उत्सव’. दुसऱ्या शतकातील शुद्रकाच्या ‘मृच्छकटिकम’ या संस्कृत नाटकावरील हा चित्रपट होता. वसंतसेना नामक गणिका आणि तिचा चारूदत्त हा प्रियकर यांच्यामधील श्रृंगाराबरोबरच तत्कालीन समाज रचना, संभोगाबद्दल असणारा मोकळेपणा हे विषय प्रभावीपणे मांडले होते. शशी कपूरची निर्मिती असलेल्या या सिनेमाचं दिग्दर्शन गिरीश कर्नाड यांनी केलं होतं.
9/10

कामसूत्र

रेखा, इंदिरा वर्मा, नवीन वर्मा यांसारख्या कलाकारांना घेऊन मीरा नायर यांनी १६ व्या शतकातील ‘टेल ऑफ लव्ह’ साकारली. या सिनेमातील श्रृंगारीक समागमाचे प्रसंग, भव्य सेट्स आणि कलाकारांमधील मादकता यामुळे हा सिनेमा कमालीचा श्रृंगारीक बनला. हा सिनेमा जगभरात प्रसिद्ध पावला, तरी भारतात मात्र त्यातील नग्नतेमुळे हा सिनेमा प्रदर्शित करण्यास मनाई झाली.
10/10