दिवाळी आली की घरघरावर तोरणं दिसू लागतात. तोरण हे मांगल्याचं प्रतिक मानलं जातं. आंब्याची पानं आणि झेंडूची फुलं यांच्या माळा आणि तोरणं घरोघरी दारावर दिसतात. तोरण लावून आपण दारावर येणाऱ्या लक्ष्मीचं स्वागत करत असतो. तसंच दुष्ट शक्तींना दाराबाहेर घालवण्यासाठी तोरण बांधलं जातं. |