बारा ज्योतिर्लिंग

Mar 10, 2013, 11:43 PM IST

घृष्णेश्वर

औरंगाबादच्या वेरुळ गुंफांजवळ असणारं घृष्णेश्वर शिवलिंगाची दंतकथा रोचक आहे. चमत्काराने भगवान शंकराने एका मातेला तिचा मृत पुत्र पुन्हा जिवंत करून दिला असल्याचं सांगितलं जातं. यानंतर शिवशंकर लिंगरुपाने याच ठिकाणी राहिल्याचं म्हटलं जातं.
1/13

रामेश्वरम

भारताच्या सर्वांत दक्षिणेकडे असणारं ज्योतिर्लिंग म्हणजे रामेश्वरम.या ठिकाणी भगवान श्रीरामाने भगवान शंकराची उपासना केल्याचं म्हटलं जातं. रावणाविरुद्ध लढण्याचं पाप धुण्यासाठी श्रीरामाने भगवान शंकराची उपासना केली होती. रामेश्वरम हे चारधाम यात्रेपैकी ही एक तीर्थक्षेत्र आहे.
2/13

नागेश्वर

गुजरातमध्ये असणारं दुसरं ज्योतिर्लिंग म्हणजे नागेश्वर. बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असणारं नागेश्वर नेमकं कुठलं यावर उत्तरखंड आणि महाराष्ट्रामध्ये वाद चालू आहे. मात्र शिवपुराणाप्रमाणे नागेश्वर दारुकावनातील घनदाट देवदार जंगलामध्ये वसलेलं आहे. या वर्णनानुसार उत्तराखंडाला पूर्वी दारुकावन संबोधत. आणि गुजरातमधील द्वारका परिसरात याचा कुठलाही संदर्भ आढळत नसला, तरीही आज नागेश्वर मंदिर गुजरातमध्येच असल्याचं मानलं जातं.
3/13

वैद्यनाथ

वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाचं मूळ ठिकाण झारखंडमध्ये असल्याचं म्हटलं जातं, तर दुसऱ्या मतप्रवाहाप्रमाणे हिमाचल प्रदेशात वैजनाथ असल्याची मान्यता आहे. महाराष्ट्रात असणारं परळी वैजनाथ हे देखील वैद्यनाथ शिवलिंग असल्याचं काही जणांचं मत आहे.
4/13

त्र्यंबकेश्वर

महाराष्ट्रात नाशिकमध्ये गोदावरी नदीच्या किनाऱ्यावर त्र्यंबकेश्वर मंदिर आहे. या मंदिरातील शिवलिंग त्रिमुखी आहे. हे लिंग ब्रह्म, विष्णू आणि शिव या तीनही देवतांचं प्रतिनिधित्व करतं. ब्रह्मगिरी पर्वताच्या पायथ्याशी त्र्यंबकेश्वर वसलेलं आहे. येथे धार्मिक विधी मोठ्या प्रमाणावर चालतात.
5/13

काशी विश्वनाथ

बारा ज्योतिर्लिंगांपैकी सर्वांत पवित्र मानलं जाणारं काशी विश्वनाथ हे गंगा नदीच्या घाटावर काशी म्हणजेच बनारस येथे आहे. विश्वनाथचा अर्थ विश्वाचा नाथ म्हणजेच स्वामी. बनारस हे जगाच्या इतिहासातील काही प्राचिन शहरांपैकी एक शहर माले जाते. या शहराचा लिखित इतिहास ३५०० वर्षं जुना आहे.
6/13

भीमाशंकर

भीमाशंकर हे महाराष्ट्रातल्या पुण्याजवळ आहे. पण बऱ्याच जणांच्या मतानुसार ‘शिवपुराणा’त वर्णन केलेलं भिमाशंकर हे आसामच्या गुवाहाटीमध्ये आहे. तर ‘लिंग पुराणा’त वर्णन केल्याप्रमाणे भीमाशंकर हे ओदिशामध्ये आहे. मात्र पुण्याजवळील भीमाशंकर यालाच बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक मानलं जात आहे. येथे भाविकांची कायम गर्दी असते.
7/13

केदारनाथ

हिमालयाच्या गढवाल पट्ट्यात उत्तराखंडात केदारनाथाचा निवास आहे. मंदाकिनी नदीच्या तटनिकटी केदारनाथ मंदिर आहे. हे मंदिर बहुतांशवेळा बर्फाच्छादित असतं. या मंदिरात प्रवेश करणं बर्फामुळे खूप कठीण असतं.
8/13

ओंकारेश्वर

नर्मदेकाठच्या मंधाता किंवा शिवपुरी या लहानशा बेटावर ओंकारेश्वर मंदिर आहे. ओंकार मंदिराला अमरेश्वर मंदिरही संबोधलं जातं. या बेटाचा आकार ‘ओम’कार स्वरुपाचा असल्याचं म्हटलं जातं.
9/13

महाकालेश्वर

मध्य प्रदेशच्या उज्जैन येथे महाकाल हे स्वयंभू शिवलिंग आहे. येथील लिंग दक्षिणाभिमुख आहे. बारा ज्योतिर्लिंगांपकी हे एकमेव शिवलिंग आहे, जेथे गर्भगृहच्या छतावर ‘श्री यंत्र’ कोरलेलं आहे.
10/13

मल्लिकार्जुन

कृष्णा नदीतीरावर शिखरावर असलेलं मल्लिकार्जुन. श्रीशैल मल्लिकार्जुन असंही संबोधलं जातं. याच ठिकाणी आद्य शंकराचार्यांनी शिवानंद लहरी रचलं होतं. आंध्र प्रदेशच्या कुनरूल जिल्ह्यात हे मंदिर आहे. या मंदिराच्या स्थापत्यशैलीबद्दल हे मंदिर प्रसिद्ध आहे.
11/13

सोमनाथ

शंकराच्या बारा ज्योतिर्लिंगापैकी सर्वांत पवित्र तीर्थ मानलं जातं ते सोमनाथ. गुजरातमध्ये असणाऱ्या सोमनाथचं विधीप्रमाणे प्रथम दर्शन घेऊनच पुढील ज्योतिर्लिंगं पाहावीत. हे मंदिर उध्वस्त करण्यात आलं होतं. १६ वेळा  बांधण्यात आल्याचं सांगण्यात येतं. सोम म्हणजे चंद्राने हे मंदिर सुवर्णाने बांधलं होतं. असं मानलं जातं..
12/13

आज महाशिवरात्री... पवित्र त्रिमूर्ती दत्तात्रयांपैकी एक म्हणजे शिवशंकर. विनाशाचा देव. पौरुषत्वाचा आदर्श, समस्त महिला वर्ग तपस्या करून मागेल असा पती, तपश्च्रयेला लवकर फळ देणारा भोळा सांब सदाशिव... देशात सर्वाधिक मंदिरं ज्या देवाची आहे तो हा महादेव शिवशंकर.. या शिवशंकराची महाशिवरात्री
13/13