गुजरातमध्ये असणारं दुसरं ज्योतिर्लिंग म्हणजे नागेश्वर. बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असणारं नागेश्वर नेमकं कुठलं यावर उत्तरखंड आणि महाराष्ट्रामध्ये वाद चालू आहे. मात्र शिवपुराणाप्रमाणे नागेश्वर दारुकावनातील घनदाट देवदार जंगलामध्ये वसलेलं आहे. या वर्णनानुसार उत्तराखंडाला पूर्वी दारुकावन संबोधत. आणि गुजरातमधील द्वारका परिसरात याचा कुठलाही संदर्भ आढळत नसला, तरीही आज नागेश्वर मंदिर गुजरातमध्येच असल्याचं मानलं जातं. |