भारताच्या सर्वांत दक्षिणेकडे असणारं ज्योतिर्लिंग म्हणजे रामेश्वरम.या ठिकाणी भगवान श्रीरामाने भगवान शंकराची उपासना केल्याचं म्हटलं जातं. रावणाविरुद्ध लढण्याचं पाप धुण्यासाठी श्रीरामाने भगवान शंकराची उपासना केली होती. रामेश्वरम हे चारधाम यात्रेपैकी ही एक तीर्थक्षेत्र आहे. |