१९७३ साली आलेल्या प्रकाश मेहरांच्या जंजीर सिनेमाने हिंदी सिनेसृष्टीला हादरवून सोडलं. जंजीरसारख्या देमारपटाने तोपर्यंतच्या हिंदी सिनेसृष्टीतल्या स्वप्नाळू नायकाचा चेहरा मोहराच बदलून टाकला. अस्वस्थ आणि नजरेत विखार भरलेला अमिताभच्या अँग्री यंग मॅन अवताराचा या सिनेमातून जन्म झाला. |