आयुष्याच्या उत्तरार्धात पत्नीपासून विलग होऊन मुलांकडे राहाणाऱ्या रोमँटिक वृद्ध माणसाच्या भूमिकेने अमिताभ बच्चनची जादू पुन्हा दाखवून दिली. हेमा मालिनीचं सौंदर्य आणि अमिताभचा पडद्यावरील रुबाब या सिनेमाला सुपरहिट करून गेला. हा सिनेमा अबालवृद्धांना आवडून गेला आणि म्हातारपणीही आपल्या वयाच्या योग्यतेच्या प्रमुख भूमिका मिळणारा अमिताभ पहिला चमत्कार ठरला. |