बॉलिवूडच्या अभिनेत्रींनी एकदा का वैवाहिक जीवनात प्रवेश केला की त्यांचं करिअर संपलं... असं पूर्वी समजलं जायचं... पण, आता ते दिवस गेले. सध्या अनेक अभिनेत्री आपलं प्रोफेशनल आणि पर्सनल जीवन एकत्रच आणि तेही सुनियोजितरित्या सांभाळताना दिसतात. ऐश्वर्या राय-बच्चन, शिल्पा शेट्टी-कुंद्रा, करिश्मा कपूर, मलाईका अरोरा-खान, काजोल अशा काही अभिनेत्रींची नावं यामध्ये घ्यायलाच लागेल. त्यांच्यापेक्षा तरुण अभिनेत्रींनाही मागे टाकतील अशा भूमिका त्या आजही निभावताना दिसतात. त्यांचा प्रेक्षकांमधील चार्म त्यांच्या लग्नानंतरच नाही तर त्यांना मुलं झाल्यानंतरही कायम आहे. पाहुयात, याच बॉलिवूडच्या टॉप ५ ‘मम्मीज्’… |