भारतातील टॉप १० भीतीदायक ठिकाणं

Mar 24, 2014, 14:13 PM IST
1/10

सेवॉय हॉटेल, मसूरी, उत्तराखंडहे हॉटेल खूप भीतीदायक आहे. कोणताही व्यक्ती इथं यायच्या शंभर वेळा विचार करतो आणि शेवटी येतच नाही.

सेवॉय हॉटेल, मसूरी, उत्तराखंड
हे हॉटेल खूप भीतीदायक आहे. कोणताही व्यक्ती इथं यायच्या शंभर वेळा विचार करतो आणि शेवटी येतच नाही.

2/10

ग्रॅमी ब्लॉक - मेरठउत्तर प्रदेशातील सर्वात भीतीदायक जागा म्हणून ग्रॅमी ब्लॉक ओळखली जाते. रात्रीचं सोडा इथं दिवसाही लोक जायला घाबरतात. असं म्हणतात, इथं एकदा गेलेला व्यक्ती परत कधीच येत नाही.

ग्रॅमी ब्लॉक - मेरठ
उत्तर प्रदेशातील सर्वात भीतीदायक जागा म्हणून ग्रॅमी ब्लॉक ओळखली जाते. रात्रीचं सोडा इथं दिवसाही लोक जायला घाबरतात. असं म्हणतात, इथं एकदा गेलेला व्यक्ती परत कधीच येत नाही.

3/10

दिल्ली कॅन्टदिल्ली तर देशाची राजधानी आहे. पण इथंही भूतांचं वास्तव्य असल्याचं बोललं जातं. दिल्लीतील कॅन्ट परिसरात एक महिला नेहमी पांढऱ्या साडीत लोकांना लिफ्ट मागतांना दिसते. जर कोणती गाडी थांबत नाही तर ती महिला गाडीसोबत धावते. त्यामुळं रात्री कोणीही या रस्त्यानं जात नाही.

दिल्ली कॅन्ट
दिल्ली तर देशाची राजधानी आहे. पण इथंही भूतांचं वास्तव्य असल्याचं बोललं जातं. दिल्लीतील कॅन्ट परिसरात एक महिला नेहमी पांढऱ्या साडीत लोकांना लिफ्ट मागतांना दिसते. जर कोणती गाडी थांबत नाही तर ती महिला गाडीसोबत धावते. त्यामुळं रात्री कोणीही या रस्त्यानं जात नाही.

4/10

शनिवार वाडा, पुणेपुण्यातील प्रसिद्ध शनिवारवाड्यात भूत असल्याचं लोकं बोलतात. पेशव्यांच्या या किल्ल्यात नारायणराव पेशव्यांनी `काका मला वाचवा`चा फोडलेला टाहो आजही लोकांनी ऐकू येतो असं म्हणतात. नारायणरावांचा आत्मा इथं भटकतो लोकांचं म्हणणं आहे.

शनिवार वाडा, पुणे
पुण्यातील प्रसिद्ध शनिवारवाड्यात भूत असल्याचं लोकं बोलतात. पेशव्यांच्या या किल्ल्यात नारायणराव पेशव्यांनी `काका मला वाचवा`चा फोडलेला टाहो आजही लोकांनी ऐकू येतो असं म्हणतात. नारायणरावांचा आत्मा इथं भटकतो लोकांचं म्हणणं आहे.

5/10

वृंदावन सोसायटी, ठाणेठाण्यातील वृंदावन सोसायटीमधील बिल्डिंग नं ६६ बी इथं एका व्यक्तीनं आत्महत्या केली होती. त्याची आत्मा इथं भटकत असते, असं बोललं जातं. एकदा एका सिक्युरिटी गार्डला कोणीतरी खूप जोरात थोबाडीत मारलं ज्यामुळं तो खुर्चीवरून पडला. आपल्याला बाजुच्या दुसऱ्या गार्डनं मारलं असं वाटून त्यानं त्याला मारलं. मात्र तसं घडलं नव्हतं...

वृंदावन सोसायटी, ठाणे
ठाण्यातील वृंदावन सोसायटीमधील बिल्डिंग नं ६६ बी इथं एका व्यक्तीनं आत्महत्या केली होती. त्याची आत्मा इथं भटकत असते, असं बोललं जातं. एकदा एका सिक्युरिटी गार्डला कोणीतरी खूप जोरात थोबाडीत मारलं ज्यामुळं तो खुर्चीवरून पडला. आपल्याला बाजुच्या दुसऱ्या गार्डनं मारलं असं वाटून त्यानं त्याला मारलं. मात्र तसं घडलं नव्हतं...

6/10

डिसूजा चाळ, माहिम, मुंबईमुंबईतल्या या चाळीला भूतबाधा असलेली चाळ मानलं जातं. इथं एका महिलेचा बुडून मृत्यू झाला होता. तेव्हापासून तिची आत्मा इथं भटकत असते, असं इथल्या स्थानिक लोकांचं म्हणणं आहे.

डिसूजा चाळ, माहिम, मुंबई
मुंबईतल्या या चाळीला भूतबाधा असलेली चाळ मानलं जातं. इथं एका महिलेचा बुडून मृत्यू झाला होता. तेव्हापासून तिची आत्मा इथं भटकत असते, असं इथल्या स्थानिक लोकांचं म्हणणं आहे.

7/10

डो हिल, कुर्सियांग, पश्चिम बंगालडो हिल हा खूप सुंदर असा पहाड आहे. मात्र तिथं गेल्यानंतर तुम्हाला त्याची खरी बाजू कळेल. तिथं आत गेल्यानंतर तुम्हाला रडण्याचा आवाज येईल. तिथल्या स्थानिक नागरिकांचं म्हणणं आहे की, जेव्हा ते तिथं लाकूड कापायला जातात तेव्हा त्यांना डोकं नसलेलं शरीरही पाहायला मिळतं. म्हणून तिथून आवाजही येत असतात.

डो हिल, कुर्सियांग, पश्चिम बंगाल
डो हिल हा खूप सुंदर असा पहाड आहे. मात्र तिथं गेल्यानंतर तुम्हाला त्याची खरी बाजू कळेल. तिथं आत गेल्यानंतर तुम्हाला रडण्याचा आवाज येईल. तिथल्या स्थानिक नागरिकांचं म्हणणं आहे की, जेव्हा ते तिथं लाकूड कापायला जातात तेव्हा त्यांना डोकं नसलेलं शरीरही पाहायला मिळतं. म्हणून तिथून आवाजही येत असतात.

8/10

दमास बीच, गुजरातगुजरातमधील दमास बीचवर भूतांचं वास्तव्य आहे, असं तिथले स्थानिक लोक सांगतात. त्याबद्दलच्या अनेक कथाही आहेत. या बीचवर हिंदूंची स्मशानभूमी आहे. तिथं पार्थिवांवर अंत्यसंस्कार केले जातात. त्यासोबतच परिसरात काही असामान्य कार्य केले जातात. इथं येणाऱ्या पर्यटकांना बीचवर विचित्र आवाज येतात आणि रात्रीच्यावेळी अचानक चालतांना लोक गायब झाल्याचंही दिसतात.

दमास बीच, गुजरात
गुजरातमधील दमास बीचवर भूतांचं वास्तव्य आहे, असं तिथले स्थानिक लोक सांगतात. त्याबद्दलच्या अनेक कथाही आहेत. या बीचवर हिंदूंची स्मशानभूमी आहे. तिथं पार्थिवांवर अंत्यसंस्कार केले जातात. त्यासोबतच परिसरात काही असामान्य कार्य केले जातात. इथं येणाऱ्या पर्यटकांना बीचवर विचित्र आवाज येतात आणि रात्रीच्यावेळी अचानक चालतांना लोक गायब झाल्याचंही दिसतात.

9/10

ब्रिज राज भवन पॅलेस, कोटा, राजस्थानब्रिज राज भवन पॅलेसचं वय जवळपास १७८ वर्ष आहे. १९८०मध्ये या भवनाला ऐतिहासिक हॉटेल म्हणून घोषित केलं. असं सांगितलं जातं की या हॉटेलमध्ये मेजर बर्टन नावाचं एक भूत राहतं. बर्टन हा इंग्रजांच्या काळात कोटा इथं कार्यरत होता आणि १८५७च्या सैनिकी आंदोलनात त्याला भारतीय सैनिकांनी मारलं. त्यावेळी मेजरसोबतच त्याच्या दोन मुलांचीही याच बंगल्यातील सेंट्रल हॉलमध्ये हत्या करण्यात आली होती. कोटाची पूर्व महाराणीचं म्हणणं आहे की, त्यांनी १९८०मध्ये मेजरला याच हॉलमध्ये पाहिलं होतं जिथं त्यांची हत्या झाली. त्यावेळी महाराणी या हॉलचा वापर ड्रॉईंग रूम म्हणून करत होत्या.  लोकांच्या मते हे भूत कोणालाच त्रास देत नाही . मात्र जर कोणता सिक्युरिटी गार्ड आपल्या कामाच्या वेळी रात्री झोपत असेल तर हे भूत त्याच्या थोबाडीत मारून त्याला जागं करतं.

ब्रिज राज भवन पॅलेस, कोटा, राजस्थान
ब्रिज राज भवन पॅलेसचं वय जवळपास १७८ वर्ष आहे. १९८०मध्ये या भवनाला ऐतिहासिक हॉटेल म्हणून घोषित केलं. असं सांगितलं जातं की या हॉटेलमध्ये मेजर बर्टन नावाचं एक भूत राहतं. बर्टन हा इंग्रजांच्या काळात कोटा इथं कार्यरत होता आणि १८५७च्या सैनिकी आंदोलनात त्याला भारतीय सैनिकांनी मारलं.

त्यावेळी मेजरसोबतच त्याच्या दोन मुलांचीही याच बंगल्यातील सेंट्रल हॉलमध्ये हत्या करण्यात आली होती. कोटाची पूर्व महाराणीचं म्हणणं आहे की, त्यांनी १९८०मध्ये मेजरला याच हॉलमध्ये पाहिलं होतं जिथं त्यांची हत्या झाली. त्यावेळी महाराणी या हॉलचा वापर ड्रॉईंग रूम म्हणून करत होत्या.

लोकांच्या मते हे भूत कोणालाच त्रास देत नाही . मात्र जर कोणता सिक्युरिटी गार्ड आपल्या कामाच्या वेळी रात्री झोपत असेल तर हे भूत त्याच्या थोबाडीत मारून त्याला जागं करतं.

10/10

भानगढ किल्ला, राजस्थानराजस्थान इथला भानगढ किल्ला... हा किल्ला आमेरचे राजा भगवंत दास यांनी बांधला. त्यानंतर १६व्या शतकाच्या उत्तरार्धात राजा मान सिंग यांचे भाऊ माधो सिंह यांच्या राज्याची ही राजधानी होती. माधो सिंह मुघल सम्राट अकबर (१५५६-१६०५) यांच्या दरबारात दिवाण होते. असं मानलं जातंय की भानगढ किल्ल्याला एका जादूगरानं शाप दिल्यानंतर किल्ल्याची नासधूस झाली. माधो सिंहांचा नातू अजब सिंह यांनी राजवाडा खूप उंच बांधला त्यामुळं सर्व घरांवर सावली पडली. त्यानंतर जादूगाराच्या शापानं कोणतंही घर तिथं टिकलं नाही. घराचे छप्पर पडून गेले. त्यानंतर तिथं संध्याकाळनंतर कोणीही गेलं नाही. भारतीय पुरातत्त्व विभागानं लावलेल्या पाटीवरही स्पष्ट शब्दात संध्याकाळनंतर तिथं जावू नये, असं लिहिलंय.

भानगढ किल्ला, राजस्थान
राजस्थान इथला भानगढ किल्ला... हा किल्ला आमेरचे राजा भगवंत दास यांनी बांधला. त्यानंतर १६व्या शतकाच्या उत्तरार्धात राजा मान सिंग यांचे भाऊ माधो सिंह यांच्या राज्याची ही राजधानी होती. माधो सिंह मुघल सम्राट अकबर (१५५६-१६०५) यांच्या दरबारात दिवाण होते.

असं मानलं जातंय की भानगढ किल्ल्याला एका जादूगरानं शाप दिल्यानंतर किल्ल्याची नासधूस झाली. माधो सिंहांचा नातू अजब सिंह यांनी राजवाडा खूप उंच बांधला त्यामुळं सर्व घरांवर सावली पडली. त्यानंतर जादूगाराच्या शापानं कोणतंही घर तिथं टिकलं नाही. घराचे छप्पर पडून गेले. त्यानंतर तिथं संध्याकाळनंतर कोणीही गेलं नाही. भारतीय पुरातत्त्व विभागानं लावलेल्या पाटीवरही स्पष्ट शब्दात संध्याकाळनंतर तिथं जावू नये, असं लिहिलंय.