६. मध्यमवर्गीय माणसांच्या दैनंदिन जीवनातल्या समस्या वात्रटिकांच्या अंगाने मांडल्या. यानंतर पंजाब पोलिसांच्या यंत्रणेला चिमटे काढणारा महौल ठीक है हा सिनेमा काढून सिनेमा क्षेत्रात पाऊल ठेवलं. हा सिनेमा यशस्वी झाला. बऱ्याच हिंदी सिनेमांमध्येही विनोदी भूमिकांमध्ये भट्टी दिसले. आ अब लौट चलेमधील इक्बाल सिंग, फना मध्ये जॉली गुड सिंग अशा अनेक भूमिका त्यांनी केल्या. जिजाजी नामक पंजाबी सिरीजही त्यांची गाजली होती. काही कॉमेडी शोमध्ये ते परीक्षक म्हणूनही दिसले होते. |