‘मॅड आर्ट एंटरटेनेंट’ ही स्वतःची र्मिती संस्था स्थापन करून त्यातून जसपाल भट्टी विनोदी चित्रपट, कार्यक्रम, सिरीयल्स यांची निर्मिती, दिग्दर्शन करत. याशिवाय त्यांनी चंडिगढमध्ये ‘जोक फॅक्टरी’ नामक स्टुडिओ स्थापन केला होता आणि ‘मॅड आर्ट’ हे ट्रेनिंग स्कूलही स्थापन केलं होतं. आगामी ‘पॉवर कट’ या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त असताना जालंधर येथे पहाटे कार अपघातात त्यांचं निधन झालं. |