दिवाळी प्रकाशाचा सण म्हणून ओळखला जातो. त्यामुळे काळा रंग तुमच्या आवडीचा असला तरी दिवाळीत मात्र तो परिधान करणं टाळाच. देवी लक्ष्मी प्रकाशानं खूश होते, असं समजलं जातं. तर मग तुमच्या वॉर्डरोबमध्ये जितके लाल, गुलाबी, पिवळा, हिरवा, सोनेरी यांसारख्या रंगांचे कपडे असतील त्यातला कोणता ड्रेस तुम्हाला दिवाळीमध्ये घालायला आवडेल त्याची तयारी अगोदरपासूनच करून ठेवा. म्हणजे वेळीच तुमची धांदल उडणार नाही. |