‘रेडी’ हा पुन्हा सलमान खानच्या धमाल स्वभावामुळे सुपरहिट ठरलेला विनोदी सिनेमा. दबंगच्या यशानंतर हा सिनेमा हिट करून सलमान खानने आपला जमाना आणला. हा सिनेमा ऍक्स फिल्म नसून विनोदी आणि कौटुंबिक स्वरुपाचा होता. लोकांना या ही सिनेमात सलमान खान खूप आवडला. या सिनेमाने 184 कोटींचा उद्योग केला. या सिनेमात सलमानसोबत असिन, परेश रावल आणि महेश मांजरेकरही होते. |