दुसरीच फिल्म यशराज बॅनरची आणि त्यातही रणबीर सोबत कुठलाही मोठा अभिनेता नव्हता. होत्या त्या तीन हॉट अभिनेत्री. मिनिषा लांबा, बिपाशा बासू आणि दीपिका पदूकोणसोबत त्याचा रोमांस लोकांना आवडला. यातील रणबीरची प्ले-बॉय इमेज आणि नंतर माफी मागण्यासाठी मुलींसाठी वाट्टेल ते करण्याची तयारी असलेला तरूण अशी भूमि का साकारल्यामुळे मुलींमध्ये रणबीरचं फॅन फॉलोइंग वाढलं |