`मालामाल वीकली` या सुपरहिट सिनेमाचा सिक्वल घेऊन प्रियदर्शनने `कमाल धमाल मालामाल` हा सिनेमा आणला. मात्र या सिनेमात काहीच धमाल नसल्याचं लक्षात आल्यामुळे प्रेक्षकांनी सिनेमा पाहिलाच नाही आणि हा सिनेमा काहीच कमाल करू शकला नाही. श्रेयस तळपदे आणि नाना पाटेकर यांच्यासारखे दोन तगडे मराठी अभिनेते असूनही हा सिनेमा निकालात लागला. |