२०१२ च्या आठवणी...

Dec 12, 2012, 03:51 PM IST

महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या शासनकाळाला ६० वर्ष पूर्ण

यूनायटेड किंग्डमच्या सर्वात जास्त काळ जीवित राहिलेल्या आणि सत्ता उपभोगलेल्या महाराणी एलिझाबेथ यांच्या शासनकाळाला यंदा ६ फेब्रुवारी १९५२ रोजी तब्बल ६० वर्ष पूर्ण झाली.

1/11

जेम्स बॉन्डची ५० वर्ष

५ ऑक्टोबर २०१२ रोजी ‘द ००७ फ्रेन्चाईज’नं आपल्या कारकिर्दीची ५० वर्ष पूर्ण केली. १९६२ साली याच दिवशी एक सभ्य दिसणाऱ्या सिक्रेट एजंट लोकांसमोर दाखल झाला होता.

2/11

‘टायटानिक’च्या जलसमाधीला १०० वर्ष पूर्ण

त्यावेळचं हे सर्वांत आधुनिक आणि अवाढव्य जहाज म्हणून ‘टायटानिक’ प्रसिद्ध झालं. साऊथेम्प्टन पासून न्यूयॉर्क शहरापर्यंतचं अंतर हे जहाज चार दिवसांत पूर्ण करणार होतं. १४ एप्रिल १९१२ च्या रात्री त्याचा प्रवास सुरू झालाही पण तो कधीच पूर्ण झाला नाही. १५ एप्रिल १९८२ च्या सकाळपर्यंत या जहाजाला जलसमाधी मिळाली होती. या अपघातात दीड हजारांच्या वर यात्रेकरूंनाही जलसमाधी मिळाली. आत्तापर्यंतच्या इतिहासातील या घटनेला समुद्रातील सर्वात भयानक घटना म्हणूनही ओळखलं जातं.

3/11

३० वर्षांचे इमोटिकॉन्स...

कम्प्युटरवर चित्रांच्या साहाय्यानं भावना व्यक्त करणारी ही इमोटिकॉन्स... आनंद, दु:ख, गंभीरता अशा भावना चिन्हांच्या साहाय्यानं पोहचवणाऱ्या इमोटिकॉन्सचा जन्म १९ सप्टेंबर १९८२ रोजी झाला होता. ही चिन्ह कोलन, डॅश आणि अशा चिन्हांच्या साहाय्याने बनवण्यात आला होता.

4/11

ईमेलला ४१ वर्ष पूर्ण

अमेरिकेमध्ये प्रोग्रामर म्हणून काम करणाऱ्या रे टोमिलसन यानं ऑक्टोबर १९७१ मध्ये पहिला-वहिला ईमेल धाडला होता. ही गोष्ट वेगळी की, भारतामध्ये ही बातमी पोहचण्यासाठी तब्बल २० वर्ष लागली.

5/11

‘मॅसेज’ची २० वर्ष...

नील पॅपवर्थ या २२ वर्षीय ब्रिटिश सॉफ्टवेअर इंजिनिअरनं ३ डिसेंबर १९९२ रोजी जगातला पहिला टेक्स्ट (शाब्दिक) मॅसेज पाठवला होता. त्याकाळी मोबाईल फोनला कि-बोर्ड नावाचा प्रकार नव्हताच त्यामुळे त्यानं हा पहिला मॅसेज संगणकाच्या कि-बोर्डच्या साहाय्यानं टाईप केला होता.

6/11

`इस्रो`ची कामगिरी

भारतीय अंतराळ संशोधन केंद्र (इस्रो)नं ९ सप्टेंबर २०१२ रोजी आपल्या १०० व्या मिशनचा शुभारंब केला. इस्रोनं १९ एप्रिल १९७५ रोजी ‘आर्यभट्ट’ या आपल्या पहिल्या उपग्रहानं श्रीगणेशा केला होता. आत्तापर्यंत इस्रोनं तब्बल खास भारतीय बनावटीचे ६३ उपग्रह आणि ३५ रॉकेटसची आपल्या इतिहासात नोंद केलीय.

7/11

भारतीय चित्रपटसृष्टीला १०० वर्ष पूर्ण

२१ एप्रिल २०१२ रोजी भारतीय चित्रपटसृष्टीला १०० वर्ष पूर्ण झाली. भारतीय सिनेमा जगताचा जनक दादासाहेब फाळके यांनी ३ मे १९१३ रोजी ‘राजा हरिश्चंद्र’ हा मूकपट प्रदर्शित केला होता.

8/11

भारतीय संसदेला ६० वर्ष पूर्ण

भारतीय लोकसभेची पहिली सभा १३ मे १९५२ रोजी पार पडली होती. डॉ. एस. राधाकृष्णन यांची भारताच्या राज्यसभेचे पहिले अध्यक्ष म्हणून निवड झाली होती. तर गणेश माळवणकर यांची लोकसभेचे पहिले अध्यक्ष म्हणून निवड झाली होती.

9/11

‘मास्टर ब्लास्टर’ची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २३ वर्ष पूर्ण

वयाच्या सोळाव्या वर्षी मराठमोळ्या सचिन तेंडुलकरनं १५ नोव्हेंबर १९८९ रोजी आपल्या आंतराराष्ट्रीय कारकिर्दीतील प्रथम पाऊल टाकलं. कराचीमध्ये पाकिस्तानविरुद्ध ही त्याची पहिली वहिली मॅच झाली. तो जेव्हा अहमदाबादमध्ये १५ नोव्हेंबर २०१२ रोजी झालेल्या इंग्लंडविरुद्धच्या टेस्ट मॅचच्या पहिल्या दिवशी मैदानावर उतरला तेव्हा त्यानं आपल्या कारकिर्दीची २३ वर्ष पूण केली होती.

10/11

शाहरुखची बॉलिवूडमधली २० वर्ष पूर्ण

२५ जून १९९२ मध्ये शाहरुख खान पहिल्यांदाच ‘दिवाणा’ या सिनेमातून ऋषी कपूर आणि दिव्या भारती यांच्यासोबत मोठ्या पडद्यावर झळकला आणि याच सिनेमासाठी नवोदित कलाकार म्हणून त्याला पहिलं-वहिलं फिल्मफेअर अवॉर्डही मिळालं.

11/11