तुम्ही एटीएमचा अधिक वापर पैसे काढण्यासाठी करत असाल तर तितकाच धोकाही आहे. त्यामुळे एटीएमचा कसा वापर करायचा, काय सुरक्षितेची काळजी घ्यायची, पैसे काढताना कसे दक्ष राहायचे याबाबत काही टिप्स आम्ही तुम्हाला देत आहोत. त्याचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल आणि तुमचे पैसे सुरक्षित राहतील.
बॅंकिंग व्यवहारात सुटसुटीतपणा आलाय. मात्र, काहीवेळी बॅंकिंग व्यवहाराचा सुटसुटीतपणा आपल्याच अंगाशी येतो. अनेकवेळा नेटबॅंकिंग धोकादायक झाली आहे. खाते हॅक करून आपल्या बॅंक खात्यातून पैसे काढण्याच्या काही घटना घडल्यात आहेत. तर काहीवेळी आपल्या एटीएमचा पीन नंबर मिळवून चोरीच्या घटनांत वाढ झाली आहे. तर काहीवेळा एटीएमचा पासवर्ड कॉपी करून त्याद्वारे चोरी होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे एटीएमबाबत, कशी घ्याल काळजी. याच्या काही टिप्स्.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा. झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.